Download App

‘बारामतीचा ‘प्रसाद’ नगरकरांना मानवणार नाही’ रोहित पवारांवर विखे पाटलांचे टीकास्त्र

Radhakrishna Vikhe Patil On Rohit Pawar : आज अहमदनगर लोकसभा मतदारसंघासह राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे.

Radhakrishna Vikhe Patil On Rohit Pawar  : आज अहमदनगर लोकसभा मतदारसंघासह (Ahmednagar Lok Sabha) राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे (Mahayuti) सुजय विखे (Sujay Vikhe) आणि महाविकास आघाडीचे (MVA) निलेश लंके (Nilesh Lanke) अशी लढत पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे मतदानाच्या दिवशी आरोपांच्या जोरदार फैरी सुरु झाल्या आहेत.

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मोठा आरोप करत गावागावात पाकीट वाटत असल्याचा आरोप सुजय विखेंवर केला. तर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी देखील सुजय विखेंवर आरोप करत बारामतीप्रमाणे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या आदल्या रात्री  पैशाचा पाऊस पडत असल्याचा आरोप केला आहे. तर आता या आरोपांवर सुजय विखेंनी प्रत्युत्तर देत रोहित पवार आणि निलेश लंकेंवर टीका केली आहे.

सध्या सोशल मीडियावर पारनेरचे भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांच्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये  रस्त्यावरती पैसे पडलेले आहेत तर राहुल शिंदे गाडीच्या बाजूला उभे असल्याचे दिसत आहे. याबाबत बोलताना सुजय विखे म्हणाले , जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो एकाच बाजूचा असून खरा व्हिडिओ समोर येणे गरजेचे आहे.

माध्यमाशी बोलताना सुजय विखे पुढे म्हणाले, पैसे गाडीत नव्हे तर गाडी बाहेर पडलेले आहेत त्यामुळे हे पैसे कोणाचे आहेत ते सांगायची गरज नाही, जिल्ह्यातील गुंडागिरीचे राज्य पारनेर मधील जनताच उध्वस्त करणार आहे असं देखील यावेळी सुजय विखे म्हणाले.

तर रोहित पवारांना उत्तर देत सुजय विखे म्हणाले, रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोच्या कर्मचाऱ्यांना 2019 मध्ये  पैसे वाटप करताना पकडले आहे. त्यांच्यावर आजही गुन्हा दाखल आहे असं म्हणत त्यांनी आमदार रोहित पवारांना टोला लावला.

दुसरीकडे या प्रकरणात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी देखील उत्तर देत रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. त्यांनी एक ट्विट करत रोहित पवारांवर टीका केली आहे.

त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे की, बारामतीचा ‘प्रसाद’ नगरकरांना मानवणार नाही याची जाणीव रोहित पवारांना झाली आहे. परभवाच्या नैराश्येतून ते आता वायफळ बडबड करायला लागले आहेत. असं विखे पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

लग्न कधी करणार? भरसभेत राहुल गांधीना प्रश्न, उत्तर देत म्हणाले, लवकर करावे लागेल..

follow us

वेब स्टोरीज