मतदानाच्या एक दिवस अगोदरच वातावरण तापलं! अहमदनगरमध्ये दोन गटांत राडा

मतदानाच्या एक दिवस अगोदरच वातावरण तापलं! अहमदनगरमध्ये दोन गटांत राडा

Dispute Two Groups In Ahmednagar : सध्या लोकसभेचा रणसंग्राम सुरू आहे. उद्या देशभरात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यासह 11 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या. (Ahmednagar Lok Sabha Election)  त्यानंतर सुरू होतो तो रात्रीस खेळ चाले हा प्रचार. सध्या उमेदवारांसह कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. दरम्यान, मतदानाला एक दिवस बाकी असताना जुना वाद समोर आला आहे. त्यामध्ये चांगलाच राडा झाल्याच पाहायला मिळालं.

 

दगडफेकीत कार्यालय गाडीचं नुकसान

अहमदनगर शहरातील माजी नगरसेवक सचिन जाधव आणि सागर मुर्तडकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं समोर आलं आहे. या भांडणाला जुन्या प्रकरणाची किनार आहे. या वादात वाहनाची आणि कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. या दगडफेकीत सागर मुर्तडकर यांचं कार्यालय फोडण्यात आलं असून, एका स्कार्पिओ वाहनाचंही मोठं नुकसान झालं आहे. अहमदनगर शहरातील मंगलगेट परिसरात ही घटना घडली. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे. पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

 

लंके-विखे लढत

अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी उद्या 13 मे रोजी मतदान होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच ही थेट लढत होत आहे. खासदार सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा हा सामना आहे. निलेश लंकेंनी खासदार होण्याचा निश्चिय केला आहे, तर अजित पवारांनी पारनेरमध्ये येऊन, तू कसा खासदार होतो तेच बघतो असा दम लंके यांना भरला आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघात चांगलीच चूरस निर्माण झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज