अजित दादा जरा थांबा! 4 जूनला कळेल निलेश लंके किस झाड की पत्ती है

अजित दादा जरा थांबा! 4 जूनला कळेल निलेश लंके किस झाड की पत्ती है

Ahmednagar Lok Sabha Election : अजित पवारांनी निलेश लंके यांच्यावर ‘निलेश लंके तू किस झाड की पत्ती है’ अशा शब्दांत टीका केली होती. त्यावर आमदार रोहित पवारांनी लंके यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना जोरदार घणाघात केला आहे. रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, येथील सामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे येत्या 4 जून पर्यंत तुम्ही थांबा दादा. (Ajit Pawar) तुम्हाला जनता निलेश लंके (Nilesh Lanke) किस झाड की पत्ती है हे दाखवतील अशा शब्दांत पलटवार केला आहे.

 

वस्ताद कायम एक डाव राखून ठेवतो

पुढे बोलताना पवार यांनी वस्ताद नेहमी एक डाव राखून ठेवतो असं म्हणत अजित पवारांचं नाव न घेता जोरदार हमला केला. वस्तादने शिकवल्यावर पहिलवान पहिली कुस्ती खेळल्याव पहिलवानाला वाटत आपल्याला हे जमतं. मग तो अशा एकदोन कुस्त्या खेळल्यावर वस्तादबरोबर कुस्ती खेळतो. त्यामध्ये वस्ताद पहिलवानाला चितपट करतो. असं म्हणत वस्ताद कायम एक डाव राखून ठेवतो असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांवर टीका केली.

 

वस्तादने कसा डाव टाकला

आज लोकांशी कनेक्ट असलेला खासदार आपल्याला हवा आहे. निलेश लंके हे लोकांमध्ये वावरणारे उमेदवार आहेत. तसंच, त्यांनाही राजकारण कळत. गेली सहा महिने कुणाच्या गटात होते. आता कुणाच्या गटात आहेत? असं म्हणत वस्तादनने टाकला की नाही डाव असंही रोहित पवार यावेळी म्हणाले आहेत.

 

काय म्हणाले होते अजित पवार

मला इथे आल्यानंतर कळालं की महायुतीच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली जाते आहे. अधिकाऱ्यांना भर सभेतून दम दिला जातो. निलेश लंके ज्या शाळेत शिकतो. त्या शाळेचा मी हेडमास्तर आहे, असे सांगून माझ्या नादाला लागू नको माझ्या नादाला लागणाऱ्यांचा मी पुरता बंदोबस्त केला आहे. तसंच, निलेश लंके तु किस झाड की पत्ती है अशा शब्दांत पवारांनी टीका केली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube