Nilesh Lanke : सभेचे नियोजन फिस्कटले लंके परतले…जनसंवाद नव्हे तर ही फसवणूक यात्रा… भाजपचा हल्लाबोल

Nilesh Lanke : सभेचे नियोजन फिस्कटले लंके परतले…जनसंवाद नव्हे तर ही फसवणूक यात्रा… भाजपचा हल्लाबोल

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरू झाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी नगर दक्षिण मतदारसंघांमध्ये स्वाभिमानी जनसंवाद यात्रा काढली आहे. तीसगावमध्ये सभेचे नियोजन करण्यात आले होते. नियोजन फिस्कटल्याने लंके हे नाराज होऊन परतल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. ही जनसंवाद यात्रा नसून फसवणूक यात्रा असल्याची टीका आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

उमेदवारी जाहीर होताच पवारांचा शिलेदार अडचणीत : बाळ्यामामांच्या गोदामांवर MMRDA चे छापे

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं असून आता नगर दक्षिणेमध्ये देखील या निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून हालचाली वाढल्या आहेत. महायुतीकडून सुजय विखे (Sujay Vikhe) यांना उमेदवारी जाहीर झाली तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके हे लोकसभेच्या आखाड्यात आहेत.

सनी लिओनी आणि प्रभुदेवा पुन्हा येणार एकत्र; बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या चित्रपटाचं शुटिंग सुरु

यामध्ये लंके यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नगर दक्षिणेमध्ये स्वाभिमानी जनसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे. प्रत्येक तालुक्यांमध्ये ही जनसंवाद यात्रा होत असून आज याचे नियोजन तिसगाव या ठिकाणी होते. मात्र, सभेचे नियोजन न झाल्यामुळे लंके यांनी आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांवरती नाराजी व्यक्त करत ते शिरापूरकडे रवाने झाले याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ऑस्करच्या अधिकृत पेजवर दीपिका बनली ‘दीवानी मस्तानी’; पती रणवीर सिंगने केली ‘ही’ कमेंट

दरम्यान, लंके यांनी स्थानिक नागरिकांचे संवाद साधत त्या ठिकाणावरून रवाना झाल्याचे व्हिडिओ देखील आता प्रसारित होत आहेत. लंके यांच्या जनसंवाद यात्रेवर टीका-टिप्पणी करताना भाजपचे नगर जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग म्हणाले, ही जनसंवाद यात्रा नसून ही फसवणूक यात्रा आहे. निलेश लंके यांनी हा फुगा फुगवलेला असून हा लवकरच फुटणार आहे.

लोक लंके यांच्या जनसंवाद यात्रेला प्रतिसाद देणार नाही कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर विश्वास ठेवून पुन्हा एकदा ते सुजय विखे यांनाच निवडून देतील, असा विश्वास देखील भालसिंग यांनी व्यक्त केला. गेली पाच वर्षे ते देखील सत्तेत होते. मात्र, त्यांनी कुठले विकास कामे केले हे त्यांनी देखील दाखवून द्यावे. पक्ष बदलू, दल बदलू म्हणत भालसिंग यांनी थेट लंकेंवरतीच निशाणा साधला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube