उमेदवारी जाहीर होताच पवारांचा शिलेदार अडचणीत : बाळ्यामामांच्या गोदामांवर MMRDA चे छापे

उमेदवारी जाहीर होताच पवारांचा शिलेदार अडचणीत : बाळ्यामामांच्या गोदामांवर MMRDA चे छापे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे (Bhiwandi Lok Sabha) उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे (Suresh Mhatra) यांच्या गोदामांवर कारवाई करण्यात आली आहे. येवई येथील आर. के. लॉजी पार्क येथील गोदाम बांधकामांवर एमएमआरडीएने छापे टाकले आहेत. हे बांधकाम अनधिकृत असल्याचे म्हणत ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सुरेश म्हात्रे यांनी ही कारवाई राजकीय दबावातून केली असल्याचा आरोप केला आहे. (MMRDA raids the godown of Suresh Mhatre who is the announced candidate for Senior Pawar from Bhiwandi)

या कारवाईवर बोलताना सुरेश म्हात्रे म्हणाले, संपूर्ण तालुक्यातील गोदाम बांधकामांना संरक्षण देण्यासाठी शासनाने अध्यादेश काढला आहे. त्यानुसार सर्व बांधकाम संरक्षित करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाकडूनही स्थगिती आदेश घेतले आहेत. मी उभ्या केलेल्या गोदाम व्यवसायातून 90 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तालुक्यातील अनधिकृत गोदाम व्यवसाय भ्रष्टाचाराची जननी कपिल पाटील हेच आहेत. एमएमआरडीए राजकीय दबावातून कारवाई करत आहे. ‘जिनके घर शिसेके होते है, ओ दुसरे के घर पर पत्थर नहीं फेका करते, असाही इशारा त्यांनी दिला आहे.

RBI Policy : कर्जदारांसाठी मोठी बातमी! कर्ज हप्त्याचा व्याजदर ‘जैसे थे’; EMI वाढणार नाही

भिवंडीमधून सुरेश म्हात्रेंना उमेदवारी :

काल (चार एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी आणखी दोन उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यात भिवंडीमधून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे आणि बीडमधून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यापूर्वी वर्धा, दिंडोरी, शिरुर, बारामती आणि अहमदनगर या मतदारसंघांमधून उमेदवार जाहीर करण्यात आले होते. आता माढा आणि रावेर या तीन जागांवरील उमेदवारांची घोषणा होणे अद्याप बाकी आहे.

‘रत्नागिरीवरील दावा सोडलेला नाही, सोडणारही नाही’; सामंतांनी पुन्हा ठणकावलं

माढा अन् रावेरमध्ये कोण असणार उमेदवार?

महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गट नऊ जागा लढविणार आहे. यात आतापर्यंत सात जागांवर उमेदवारांची घोषणा झाली आहे. तर अद्याप माढा आणि रावेर या जागांवर उमेदवारांची घोषणा बाकी आहे. माढ्यातून भाजप नेते धैर्यशिल मोहिते हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube