निलेश लंकेंना मदत लागल्यास आम्ही तयार; शरद पवारांचा लंकेंना शब्द

Nationalist Congress Party (Sharad Chandra Pawar) Party President Sharad Pawar put an end to the talks of Nilesh Lanka joining the party.

Sharad Pawar : आगामी लोकसभा (Loksabha Election) निवडणुका जवळच येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु आहे. अनेक नेत्यांकडून पलटी मारण्यात येत असल्याचं चित्र आहे. अशातच आता अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरु आहे. निलेश लंके शरद पवार गटात जाणार असल्याचं बोललं जात होतं. त्यातच आज लंके यांनी शरद पवार यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे. यावेळी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी निलेश लंके यांना मदत लागल्यास आम्ही तयार असल्याचा शब्दच निलेश लंके यांना दिला आहे.

मोहिते पाटील अन् रामराजेंचा विरोध… निंबाळकर आता विजयाचे गणित कसे सोडवणार?

शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पारनेरची जागा लढण्याचा विचार जेव्हा आमच्या मनात आला तेव्हा आणखी काही आमचे सहकारी होते. पण थोडी माहिती घेतल्यानंतर असे दिसून आले की, निलेश लंके यांची निवड केली. पारनेर हा दुष्काळी तालुका. तिथे एमआयडीसी आणली. कारखानदारी वाढवली. तिथे दुधाचा धंदाही वाढला. या सगळ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न आम्ही केला. अत्यंत कष्ट करणारा म्हणून आम्ही लंकेकडे पाहतो. त्यांच्या विधानसभेच्या प्रचारालाही गेलो होतो. त्यांची बांधिलकी जनतेशी होती. लोकांच्यासाठी काम करतात त्यांनी मी प्रोत्साहन देतो. पक्षाच्या कार्यालयात ते आले त्यानिमित्तानं त्यांचे स्वागत करतो. सध्या दुष्काळाचे सावट आहे. तिथे चिकाटीनं काम करणाऱ्या लंकेसारख्या कार्यकर्त्यांची गरज आहे. त्यांना मदत लागल्यास आम्ही तयार आहोत, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

जुन्या शिलेदारांवर भिस्त, 13 खासदारांना पुन्हा तिकीट; धक्कातंत्राचा प्रयोगही ‘सावध’

राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके अजित पवार यांच्या गटाला सोडून शरद पवार गटात सामिल होणार असल्याची चर्चा रंगली. अशातच पुण्यात आज लंकेंनी शरद पवारांची भेट घेतली. भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शरद पवारसाहेब सांगतील तोच आदेश असल्याचं ठणकावून सांगितलं आहे. एका अर्थाने आपण शरद पवारांसोबतच असल्याचे संकेत लंकेंनी दिले आहेत.

साहेब सांगतील तोच आदेश..
खासदारकीची आणि कुठल्याही निवडणुकीची शरद पवारांसोबत माझी चर्चा झालेली नाही. अजूनही मी पवारांच्या विचारधारेसोबत आहे. बहुजन समाजासह सर्वसामान्यांना घेऊन जाणारा जो नेता आहे त्या नेत्याची विचारधारेसोबत आहोत. शरद पवारसाहेब सांगतील तोच आदेश असल्याचं निलेश लंके यांनी स्पष्ट केलं आहे.

follow us