जुन्या शिलेदारांवर भिस्त, 13 खासदारांना पुन्हा तिकीट; धक्कातंत्राचा प्रयोगही ‘सावध’

जुन्या शिलेदारांवर भिस्त, 13 खासदारांना पुन्हा तिकीट; धक्कातंत्राचा प्रयोगही ‘सावध’

BJP Candidate List : लोकसभा निवडणुकीसाठी काल भारतीय जनता पार्टीने दुसरी यादी (BJP Candidate List) जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील 20 मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यादी जाहीर होण्याआधी असे (Lok Sabha Election) सांगितले जात होते की भाजप अनेक खासदारांची तिकीटे कापणार. परंतु, तीन ते चार खासदारांचा अपवाद वगळता भाजपाचं धक्कातंत्र कुठे दिसलं नाही. विद्यमान खासदार प्रितम मुंडे, गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, संजय धोत्रे आणि उन्मेष पाटील यांना नारळ देण्यात आला. या खासदारांचा अपवाद वगळला तर पक्षाने पुन्हा एकदा जुन्या शिलेदारांवर विश्वास दाखवल्याचे यादीतून स्पष्ट होत आहे.

BJP Candidate List : गडकरींना तिकीट मिळालं, ठाकरे म्हणाले, बरं झालं निदान आज तरी..

मागील निवडणुकीत भाजपने 25 जागांवर उमेदवार दिले होते.  त्यातील 23 जागा जिंकल्या होत्या. यातील 19 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर 13 विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर 7 मतदारसंघात कुणाच्याही फारसे चर्चेत नसलेले चेहरे समोर आणले आहेत. या यादीत 5 महिला उमेदवारांचीही नावे आहेत. ज्या ठिकाणी विजयाची खात्री आहे अशा ठिकाणी नवीन चेहरे देण्याचा नवा प्रयोग भाजपाने केला आहे. परंतु, हा प्रयोग महाराष्ट्रात टाळला आहे. नितीन गडकरी, भारती पवार, रावसाहेब दानवे, कपिल पाटील यांना पुन्हा संधी मिळाली आहे. तसेच राज्य सरकारमधील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही पक्षाचा आदेश मानावा लागला आहे.

मुंबईबाहेरील मतदारसंघांचा विचार केला तर 18 पैकी 13उमेदवार कायम ठेवले आहेत. पाच ठिकाणी बदल करण्यात आला आहे. पुण्याचे माजी खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले. त्यानंतर या जागेवर माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना संधी मिळाली. तर अकोल्याचे खासदार संजय धोत्रे आजारी असल्याने त्यांचा मुलगा अनुप धोत्रे  यांना संधी देण्यात आली.

भाजपकडून नारी शक्तीचा सन्मान! लोकसभेच्या 20 उमेदवारांमध्ये पाच महिलांना दिलं स्थान

मुंबईत दोन खासदारांना डच्चू 

उत्तर मुंबई या सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मतदारसंघात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली. येथे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना यंदा पक्षाने उमेदवारी नाकारली. उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघात खासदार मनोज कोटक यांच्यावर नाराजी वाढली होती. त्यामुळे त्यांना नाकारून भाजपने मिहीर कोटेचा या उमेदवाराला संधी दिली. या मतदारसंघात गुजराती मतदारांचे प्राबल्य आहे.

विद्यमान खासदारांवर पुन्हा विश्वास 

धुळ्यात सुभाष भामरे, नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर, नगरमधून सुजय विखे पाटील, दिंडोरीतून भारती पवार, भिवंडीतून कपिल पाटील, जालन्यातून रावसाहेब दानवे, रावेरमधून रक्षा खडसे, नागपूर मतदारसंघात नितीन गडकरी, वर्ध्यातून रामदास तडस, नंदूरबारमधून डॉ. हिना गावित, लातूरमधून सुधाकर श्रुंगारे, माढ्यातून रणजित निंबाळकर आणि सांगली मतदारसंघातून खासदार संजय काका पाटील या खासदारांना पुन्हा संधी मिळाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube