सनी लिओनी आणि प्रभुदेवा पुन्हा येणार एकत्र; बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या चित्रपटाचं शुटिंग सुरु

सनी लिओनी आणि प्रभुदेवा पुन्हा येणार एकत्र; बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या चित्रपटाचं शुटिंग सुरु

Sunny Leone : बॉलिवूडमधील (Bollywood) सुप्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनीनं (Sunny Leone) तिच्या स्टाईलनं जगभरामध्ये विशेष ओळख निर्माण केली. तिचा चाहता वर्ग मोठा आहे. सनीनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच तिच्या आयटम साँग्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. सनी तिच्या नृत्यशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते. चित्रपटांबरोबरच सनी छोट्या पडद्यावरील रोडीज या शोमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. काही दिवसांपूर्वी तिची ‘अनामिका’ ही वेब सीरिज (Web Series) रिलीज झाली. या सारिजमध्ये अॅक्शन मोडमध्ये सनी दिसली. आता अभिनेत्री सनी लिओनी, हिमेश रेशमिया आणि प्रभुदेवा एका आगामी चित्रपटासाठी एकत्र काम करत आहेत.

सध्या अभिनेत्री त्याच सिनेमाच्या शूटिंगसाठी अभिनेत्री मस्कतला जात आहे. हा प्रकल्प सनीचा प्रभुदेवासोबतचा दुसरा प्रोजेक्ट असणार आहे. अभिनेत्रीने यापूर्वी ‘पेट्टा रॅप’ नावाच्या चित्रपटातील एका गाण्यासाठी प्रसिद्ध चित्रपट निर्माता-अभिनेत्यासोबत काम केले होते. मात्र, प्रेक्षकांना सनी आणि हिमेश रेशमिया पहिल्यांदाच स्क्रीन स्पेस शेअर करायला मिळणार आहे.

अनोख्या सहकार्याने प्रेक्षक उत्सुक झाले आहेत आणि सनी लिओनच्या चाहत्यांसाठी एक मेजवानी असल्याचे वचन दिले आहे. या चित्रपटातील ट्रॅकसाठी सनी पुन्हा एकदा प्रभुदेवाकडून कोरिओग्राफ करणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सनी लिओनी सध्या लोकप्रिय डेटिंग शो स्प्लिट्सविलाच्या 15व्या आवृत्तीचे सूत्रसंचालन करत आहे. तिच्याकडे केनेडी आणि कोटेशन गँग देखील आहे.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ सिनेमाचं तगडं बजेट; अक्षय कुमार, टायगर श्रॉफ यांच्या फीचा आकडा थक्क करणारा

अभिनेत्री सनी लिओन ही एक अभिनेत्री असण्यासोबतच एक बिझनेस वुमन, फिटनेस इंस्पिरेशन देखील आहे. सनीचा स्वत:चा एक कॉस्मॅटिक ब्रॅण्ड आहे. शिवाय प्रोडक्शन हाऊस देखील नव्याने सुरू केले आहे. 98 कोटी रुपयांची एकूण संपत्ती सनीकडे आहे. सनी एका वर्षात जवळपास 12 कोटींची कमाई करते. एका चित्रपटासाठी सनी 1.2 कोटींचे मानधन घेते.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज