Union Budget 2024 What cheap and expensive : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi) नेतृत्वात सत्तेत आलेल्या एनडीए सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प (Union Budget 2024 ) सादर झाला आहे. यंदाही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीच (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये नेमकं काय स्वस्त, काय महाग? जाणून घ्या सविस्तर…
देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडून सादर; एका क्लिकवर वाचा A टू Z माहिती
या अर्थसंकल्पांमध्ये सरकारकडून अनेक वस्तूंवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. ज्यामध्ये सोन्या आणि चांदीवरील कस्टम ड्युटी घटवून सहा टक्के करण्यात आली आहे. तसेच प्लॅटिनमवरील कस्टम ड्युटीमध्ये 6.4% घट करण्यात आली आहे. त्यामुळे आता हे तीनही धातू आणि त्यांच्यापासून बनवलेल्या दागिने आणि वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत.
नागरिकांची पिळवणूक अन् गुंडांची पाठराखण…पोलीस प्रशासनावर कळमकरांचा संताप
त्यानंतर मोबाईल फोन आणि चार्जर हे देखील स्वस्त होणार आहेत. कारण यावरील बेसिक कस्टम ड्युटी कमी करून ती 15 टक्के करण्यात आली आहे. त्याचबरोबर सोलार पॅनल आणि लिथियम बॅटरी ज्यापासून फोन आणि गाड्यांच्या बॅटऱ्या बनवल्या जातात. त्यांच्या किमती देखील कमी होणार आहेत. तर ई-कॉमर्स कंपन्यांसाठी टॅक्स डिटेक्टर ऍट सोर्स म्हणजेच टीडीएस हा 1 टक्क्यावरून 0.1% करण्यात आले आहे.
Suriya : वाढदिवशी सूर्याने चाहत्यांना दिलं खास सरप्राईज; ‘कांगुवा’ सिनेमातील पहिले गाणे रिलीज
दुसरीकडे या अर्थसंकल्पामध्ये कॅन्सरसारख्या दूर्धर आजारातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे. कारण कॅन्सरवरील तीन औषधांवरील सीमा शुल्कात पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर एक्स-रे ट्यूब आणि फ्लॅट पॅनल डिटेक्टर, फोरनिकेल, ब्लिस्टर कॉपर यावरील कस्टम ड्युटी कमी केल्याने हे देखील स्वस्त होणार आहे.
अगणित नव्या संधी निर्माण करणारा ‘अर्थसंकल्प’; मोदींनी थोपटली अर्थमंत्र्यांची पाठ
मात्र या सर्व वस्तू स्वस्त जरी होणार असल्या तरी देखील या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांनुसार काही गोष्टी महाग देखील होणार आहेत. त्यामध्ये अमोनियम नायट्रेट आणि स्पेसिफाईड टेलिकॉम उपकरणांवरील कस्टम ड्युटी 10 वरून 25% करण्यात आल्याने प्लास्टिकच्या वस्तू, पीव्हीसी मटेरियल, पेट्रो केमिकल, अमोनियम नायट्रेट, सिगारेट तसेच हवाई प्रवास या गोष्टी महागणार आहेत.
काय स्वस्त झाले?
– सोने आणि चांदीचे दागिने
– प्लॅटिनम
– कर्करोगाची औषधे
– मोबाईल हॅन्डसेट आणि चार्जर
– सी-फूड
– चामड्याच्या वस्तू
– रासायनिक पेट्रोकेमिकल
– पीव्हीसी फ्लेक्स बॅनर
– सौर पॅनेल
– इलेक्ट्रिक गाड्या
– एक्स रे मशीन ट्यूब
– फेरोनिकेल
– ब्लिस्टर कॉपर
काय महाग?
– प्लास्टिकच्या वस्तू
– पेट्रोकेमिकल – अमोनियम नायट्रेट
– पीव्हीसी –
– हवाई प्रवास
– सिगारेट