Download App

नागरिकांची पिळवणूक अन् गुंडांची पाठराखण…पोलीस प्रशासनावर कळमकरांचा संताप

पोलीस प्रशासनाकडून सर्वसामान्य (Ahmednagar Police) नागरिकांची पिळवणूक केली जात आहे. या प्रवृत्तींना आळा बसला पाहिजे

Ahmednagar News : पोलीस प्रशासनावर भ्रष्टाचाराचा आरोप करत महाविकास आघाडीने (MVA) आंदोलन सुरू केले आहे. नगर जिल्ह्यात कायदा (Ahmednagar News) व सुव्यवस्था धोक्यात आली असून अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला आहे. पोलीस प्रशासनाकडून सर्वसामान्य (Ahmednagar Police) नागरिकांची पिळवणूक केली जात आहे. या प्रवृत्तींना आळा बसला पाहिजे यासाठी आम्ही महाविकास आघाडीच्यावतीने उपोषण सुरू केले आहे. आगामी काळात या गोष्टी बंद झाल्या नाहीत झाला तर आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी महापौर अभिषेक कळमकर (Abhishek Kalamkar) यांनी दिला आहे.

खासदार निलेश लंके यांनी (Nilesh Lanke) नगर जिल्ह्यातील प्रशासनाविरोधात गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाले. लंके भ्रष्टाचाराच्या कारभारावरून जिल्हा पोलिस दलाविरोधात आक्रमक झाले आहेत. नगर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर खासदार लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. दरम्यान नगर जिल्ह्यात सुरु असलेले अवैध धंदे, कायदा व सुव्यवस्था यावरून कळमकर यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले आहे.

Nilesh Lanke : मतदारसंघाचा विकास कसा करणार? खासदार लंकेंनी सांगितला संपूर्ण प्लॅन

यावेळी बोलताना कळमकर म्हणाले, नागरिकांना धमकावून त्यांच्या जागा बळकावल्या जात आहेत. नागरिकांची तक्रार दाखल करून त्यांना न्याय देण्याऐवजी प्रशासन गुंडांना पाठीशी घालून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देत आहे. मात्र आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला जाग आणून देण्यासाठी उपोषण सुरू केले आहे. खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन येणाऱ्या काळात तीव्र करू. मागण्या मान्य झाल्याशिवाय लंके मागे हटणार नाहीत. तसेच लंके हे मॅनेज होणारे नाहीत यामुळे प्रशासनाला घाम फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा कळमकर यांनी दिला.

जिल्हा पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांचा कारभार खासदार नीलेश लंके यांच्या रडारवर आहे. गुन्हे अन्वेषण शाखेतील कारभाराविरोधात उपोषण करताना खासदार लंके यांनी ‘भ्रष्टाचाराचे मडके’, असा मजकूर लिहिलेला माठ आंदोलनस्थळी बांधला होता. महाविकास आघाडीतील नेत्यांनी जिल्ह्यात बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर यावेळी चांगलेच तोंडसुख घेतले. मोठ्या संख्येने नागरिक आपल्या तक्रारी घेऊन आंदोलनस्थळी येत असल्याने पोलीस प्रशासनाचे वाभाडे निघत आहे.

फडणवीस साहेब, ‘त्या’ घटनेमागचा मास्टरमाइंड.. कळमकरांचे थेट गृहमंत्र्यांना आवाहन

follow us