नवी दिल्ली : आजपासून देशाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने अधिवेशन सुरु होईल. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचे आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey) सादर करतील. दरवर्षी अर्थसंकल्पाच्या (Budget) एक दिवस आधी सादर केले जाते.
आर्थिक सर्वेक्षण हा वित्त मंत्रालयाने जाहीर केलेला वार्षिक अहवाल आहे. गेल्या एका वर्षातील देशाच्या आर्थिक प्रगतीचा आणि कामगिरीचा हा लेखाजोखा आहे. अर्थव्यवस्थेशी संबंधित सर्व मुख्य आकडेवारी आर्थिक सर्वेक्षणात सादर केली जाते. हे अर्थव्यवस्थेतील प्रमुख घटक जसे की महागाई, पायाभूत सुविधा, कृषी आणि परकीय चलन साठा यासारख्या प्रमुख क्षेत्रांमधील ट्रेंडचे तपशीलवार वर्णन देते. यासोबतच आर्थिक सर्वेक्षण देशासमोरील आर्थिक आव्हानांची माहिती देते. हे मुख्य आर्थिक सल्लागाराच्या देखरेखीखाली अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने तयार केले आहे.
देशाचे पहिले आर्थिक सर्वेक्षण 1950-51 मध्ये सादर करण्यात आले. 1964 पूर्वी हा अर्थसंकल्पाचा भाग असायचा, पण तो वेगळा करून अर्थसंकल्पाच्या एक दिवस अगोदर प्रसिद्ध होऊ लागला. तेव्हापासून आजतागायत ही परंपरा सुरू आहे. हे दोन भागांमध्ये विभागलेले आहे. पहिल्यामध्ये देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचे संपूर्ण वर्णन दिले आहे. दुसरा भाग आरोग्य, गरिबी, हवामान बदल आणि मानव विकास निर्देशांक अशा विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलेले असते.