Manoj Jarnage Patil & Devendra Fadnavis : मराठा आरक्षण आंदोलक (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्यासाठी उद्या (दि. 27) मुंबईच्या दिशेने निघणार आहे. मात्र, जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी भाजपकडून दोन डाव टाकण्यात आले आहेत.
Video : शिवाजी महाराजांनी सण-उत्सवात खोडा घालणाऱ्यांना….; आक्रमक झालेल्या जरांगेंना फडणवीसांचं उत्तर
भापज नेत्याचं जरांगेंना साकडं
भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhyay) यांनी एक्सवर पोस्ट करत जरांगेंना मुंबईतील मोर्चा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. ज्यात उपाध्ये यांनी म्हटले आहे की, उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीगणेशाचे आगमन उद्या होत आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो.
महाराष्ट्रातील घराघरात गौरी गणपतीच्या आगमनाने आनंदाचे मांगल्याचे वातावरण आहे. मराठा समाज हा उत्सव मोठ्या भाविकतेने साजरा करतो. नेमक्या अशाच वेळी आरक्षणाचे आंदोलन उभे करून जरांगे मोर्चाने मुंबईत येत आहेत. अवघ्या मुंबईच्या जनजीवनाची घडी विस्कळीत होऊ नये यासाठी त्यांनी मुंबईतील मोर्चा पुढे ढकलावा, हीच त्यांना विनंती आहे.
गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका! मनोज जरांगेंवर आंबेडकरांचा संताप, सोशल मीडियावर पोस्टची चर्चा
सगळ्यांचे सहकार्य गरजेचे
उत्सवाचा आनंद संपूर्ण समाजाला विनाव्यत्यय घेता यावा यासाठी मुंबईची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था डोळ्यात तेल घालून काळजी घेत असते. ही व्यवस्था विस्कळीत होऊ नये, यासाठी सगळ्यांचेच सहकार्य गरजेचे असल्याचेही उपाध्ये यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
फडणवीसांनी मराठा आरक्षणाचा श्रीगणेशा केला
पुढे उपाध्ये यांनी त्यांच्या पोस्टमध्ये मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे यासाठी देवेंद्रजींचे सरकार कटिबद्ध आहे व त्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत. सरकार मराठा समाजाच्या मागण्यांसाठी प्रामाणिक व सकारात्मक असून, देवेंद्रजीनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या आरक्षणाचा श्रीगणेशा केला होता. सरकार मराठा समाजाच्या मागण्यांसाठी प्रामाणिक व सकारात्मक आहे.
उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीगणेशाचे आगमन उद्या होत आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातों
महाराष्ट्रातील घराघरात गौरी गणपतीच्या आगमनाने आनंदाचे मांगल्याचे वातावरण आहे. मराठा समाज हा उत्सव मोठ्या भाविकतेने साजरा करतो. नेमक्या अशाच…
— Keshav Upadhye (@keshavupadhye) August 26, 2025
मराठा समाजातील तरुणांसाठी अनेक योजना सुरू झाल्या आहेत. उध्दव ठाकरे-शरद पवारांच्या सरकारच्या अपयशाने त्यात विघ्न आले व मराठा समाजाला मिळालेले आरक्षण गेले. पण देवेंद्रजी अडचणी दूर करीत मार्ग काढत आहेत.अशावेळी हातात हात घालून, समस्यांचा व अडचणींचा एकत्रितपणे सामना करून सामंजस्याने कोणताही प्रश्न सोडविता यावा यासाठी सरकारसमोर दंड थोपटून उभे राहण्यापेक्षा, सहकार्याचा हात समोर केला तर, समाजाचे प्रश्नही सुटतीलच पण सामाजिक सौहार्दही वाढीस लागेल असे उपाध्ये यांनी म्हटले आहे.
जरांगेंविरोधात सदावर्ते मैदानात! मुंबईकडे कूच करण्याआधीच गुन्हा दाखल करून अटकेची केली मागणी
फडणवीसांचे ओएसडी जरांगेंच्या भेटीला
एकीकडे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जरांगेंना त्यांचे मुंबईतील आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती केली आहे तर, दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी अंतरवली सराटीमध्ये दाखल होते जरांगेंची भेट घेतली आहे. साबळे आणि जरांगे यांच्यात बंददाराआड काही मिनिटे चर्चा झाल्याचे सांगितले जात असून, आपण जरांगेंचा मुंबईत दाखल होण्याचा मार्ग नेमका कसा आहे ते जाणून घेण्यासाठी आल्याची मोघम प्रतिक्रिया साबळे यांनी दिली. मात्र,आंदोलन मागे घेण्याची विनंती केली यावर बोलणे टाळणे. त्यामुळे आता ऐन सणासुदीच्या काळात आंदोलन होऊ नये म्हणून राज्य सरकारकडून जरांगेंच्या मनधरणीसाठी साकडं घालण्याची हालचाली साबळेंच्या भेटीवरून आणि उपाध्येंच्या पोस्टवरून सुरू झाल्याची चर्चा आहे.
अंतरवलीतून निघालो तर माघार नाही – जरांगे
साबळे यांच्या भेटीनंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया समोर आली असून, आता चर्चा नाही, अंमलबजावणी करणार का? यावर बोला असे म्हणत उद्या अंतरवलीतून निघालो तर, बदल होणार नसल्याचे जरांगेंनी म्हटले आहे. आपली आणि मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींची काहीच चर्चा झाली नाही, असे जरांगे यांनी म्हटले. आम्हाला कोणताही एक रस्ता द्या. हजार रस्ते आहेत, त्यापैकी एक द्या. मी मोर्चावर ठाम असल्याचेही जरांगेंनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीसांनी अखेर चर्चेचं दार उघडलं, ओएसडी मनोज जरांगेच्या भेटीला, बैठकीत काय घडलं? #DevendraFadnavis #MarathaReservation #Manojjarange @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @CMOMaharashtra @BJP4Maharashtra @PawarSpeaks @rautsanjay61 pic.twitter.com/xr6O4ZMv8P
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 26, 2025
मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मार्ग कसा असणार?
– अंतरवालीवरून 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता निघणार…
– अंतरवाली – पैठण -शेवगाव (अहिल्यानगर)..कल्याण फाटा -आळे फाटा, शिवनेरी (जुन्नर मुक्कामी..)
– 28 ऑगस्टला खेड मार्गे चाकण, लोणावळा, वाशी चेंबूर…28 ऑगस्ट रोजी रात्री आझाद मैदानावर पोहचणार.
– 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर आंदोलन करणार…