Chandrayan 3 : भारताने आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताची महत्वाकांक्षी चांद्रयान 3 (Chandrayan 3) मोहीम यशस्वी झाली असून इस्रोने पाठवलेले हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहे. विक्रम लँडरने संध्याकाळी 6:05 वाजता चंद्रावर चांद्रयानचे यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपला ध्वज फडकवणारा भारत हा जगातला पहिला देश आहे. दरम्यान, ही मोहिम फत्ते झाल्यानंतर संपूर्ण देशभरात एकाच जल्लोष होत आहे. मात्र, या ऐतिहासिक कामगिरीमध्ये ज्यांचं योगदान अमुल्य आहे, त्या डॉ. रितू करिधाल (Dr. Ritu Karidhal) यांच्याविषयी जाणून घेऊ.
डॉ. रितू करिधाल यांनी रॉकेट वुमेन म्हणून ओळखलं जातं. त्यांच्यावर चांद्रयान 3 च्या लॅंडिंगची जबाबदारी होती. त्या मूळच्या उत्तर प्रदेशमधील लखनौच्या आहेत. त्यांचा जन्म 1975 मध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लखनौच्या नवयुग गर्ल्स कॉलेजमधून त्यांनी आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. रितू यांना लहानपणापासूनच चंद्र-तारे आणि अवकाश अभ्यासात विशेष रस होता. इस्रो आणि नासाशी संबंधित वर्तमानपत्रातील लेख, माहिती आणि छायाचित्रे गोळा करणे हा त्यांचा आवडता छंद होता.
Chandrayaan 3 : भारताचं चंद्रावर पहिलं पाऊल; आता ‘मिशन चांद्रयान’मध्ये पुढं काय?
दरम्यान, आपलं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या उच्च शिक्षणासाठी लखनौ विद्यापीठात गेला. तिथं त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी (B.Sc) आणि पदव्युत्तर (M.Sc) शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने GATE परिक्षा पास केली आणि पीएचडीला प्रवेश घेतला. पीएचडीच शिक्षण झाल्यावर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस (IISc) बंगळुरूमध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली.
1997 मध्ये रितू करिधाल यांची इस्रोसाठी निवड झाली होती. ‘रॉकेट वुमन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. रितू करिधाल यांच्यावर इस्रोने चांद्रयान-3 उतरवण्याची जबाबदारी सोपवली होती. त्या चांद्रयान-३ मिशनच्या प्रकल्प संचालक (मिशन डायरेक्टर) होत्या. यापूर्वी डॉ. रितू यांनी मंगळयान प्रकल्पात उपप्रकल्प संचालक आणि चांद्रयान-2 मिशनमध्ये प्रकल्प संचालक म्हणून काम केले आहे.
डॉ.करीधाल यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांना माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते ‘इस्रो यंग सायंटिस्ट पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांना मार्स ऑर्बिटर मिशनसाठी इस्रो टीम अवॉर्ड देण्यात आला होता. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉ. करिधाल यांचे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.
चांद्रयान-2 मिशन लाँच करताना त्यांचा भाऊ रोहित म्हणाला होता की, आम्हाला आमच्या बहिणीचा अभिमान आहे. रितू वैयक्तिक आयुष्यात पारंपारिक आहेत, पण तिच्या इस्त्रोतील कार्यात तितकीच व्यावसायिक आहे.