Download App

Commonwealth Games Scam: कलमाडींचे राजकारण संपले आणि घोटाळ्याचा ‘डाग’ही

ED gives clean chit to Suresh Kalmadi : कॉमनवेल्थ भ्रष्टाचार प्रकरणात माजी खासदार सुरेश कलमाडी ( Suresh Kalmadi) यांना ईडीने क्लीनचीट दिलीय. तर सीबीआयने दहा वर्षापूर्वीच क्लीनचिट दिलेली.

  • Written By: Last Updated:

अशोक परुडे
ED gives clean chit to Suresh Kalmadi in CWG case: यूपीए सरकारच्या काळात तीन घोटाळे गाजले. 2 जी स्प्रेक्ट्रम, कोळसा आणि कॉमनवेल्थ गेम्स 2010 हे (Commonwealth Games 2010) ते घोटाळे. पंतप्रधानपदावर असलेले मनमोहन सिंग यांना तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने जेरीस आणले होते. कोळसा घोटाळ्यात तर थेट मनमोहन सिंग यांचे नाव जोडले गेले. विरोधकांनी हे तीन घोटाळे लावून धरल्याने यूपीए सरकार लोकांच्या मनातून उतरली. त्यानंतर भाजप सत्तेत आले. ज्या घोटाळ्यांवरून आरोप झाले ते सर्व निर्दोष सुटत गेले. सीबीआयच्या तपासात कोळसा घोटाळ्यात मनमोहन सिंग यांच्याविरुद्ध पुरावे आढळले नाहीत. तसेच कथित कोळसा घोटाळा प्रकरणात सचिव एचसी गुप्ता यांच्यासह सहा जणांना सीबीआय न्यायालयाने निर्दोष सोडले. एक लाख 76 हजार कोटींच्या 2 जी स्प्रेक्ट्रम घोटाळ्यात तत्कालीन माजी दूरसंचारमंत्री ए. राजा व तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणनिधी यांची मुलगी कनिमोळी यांची निर्दोष सुटका झाली. आता कॉमनवेल्थ भ्रष्टाचार प्रकरणात माजी खासदार सुरेश कलमाडी ( Suresh Kalmadi) यांना ईडीने क्लीनचीट दिलीय. तर सीबीआयने दहा वर्षापूर्वीच क्लीनचिट दिलेली. सुरेश कलमाडी यांच्यावर काय आरोप झाले होते. कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्यामुळे कलमाडी यांचे राजकारण कसे संपले हे आपण जाणून घेऊया….


Video : नितेश राणेंच्या खात्याला फडणवीसांचा बूस्टर; रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार

सुरेश कलमाडी हे मूळचे दक्षिण भारतीय. त्यांचा जन्म चेन्नईत झालेला. त्यांचे वडिल पुण्यात स्थायिक झालेले. सुरेश कलमाडी शिक्षण पुण्यात झाले. ते राष्ट्रीय संरक्षण अकादमीतून (एनडीए) प्रशिक्षण घेऊन हवाई दलात पायलट म्हणून रूजू झाले. 1965 आणि 1971 भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी देशसेवा केली. हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर ते राजकारणात आले. 1977 मध्ये पुण्यातील भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. ते 1986 मध्ये राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. कलमाडी यांच्याबाबत एक किस्सा सांगितला जातो. मोरारजी देसाई हे पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी कलमाडी यांनी देसाई यांच्या कारवर चप्पल फेकली होती. या घनटेनंतर संजय गांधी यांचे ते खास झाले हो1982 ते 1996 पर्यंत ते राज्यसभेवर होते. 1996 मध्ये ते रेल्वे राज्यमंत्री होते. त्यानंतर 1996, 2004 आणि 2009 या तीन टर्मला मध्ये ते पुणे शहरातून खासदार झाले. शरद पवार व कलमाडी हे काँग्रेसमध्ये दोघांचे चांगले संबंध होते. पवार यांनी काँग्रेस सोडल्यानंतर कलमाडी हे पुणे शहरातील काँग्रेसचा चेहरा ठरले. कलमाडी यांच्याशिवाय पुण्यात काँग्रेस पानही हालत नव्हते.

एकाच आठवड्यात पाकिस्तानला 70 हजार कोटींचा फटका, भारताशी पंगा पडला महागात; काय घडलं?

कलमाडी यांचा खेळाशी जवळचा संबंध होता. 1996 ते 2011 पर्यंत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होते. तर 2000 ते 2023 पर्यंत ते आशियाई अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष होते. 2010 मध्ये दिल्ली येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. कॉमनवेल्थ गेम्समध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले. त्यात एक आरोप होता स्वीस टायमिंग्ज कंपनीला 141 कोटी रुपयांचे अवैध कंत्राट दिलेले. त्यात सरकारला 95 कोटींचा फटका बसला होता. हे गेम्स आयोजित करण्यासाठी दीड हजार कोटींचा खर्च अपेक्षित होता. पण हा खर्च तब्बल 70 हजार कोटींवर गेला. स्टेडियम्सच्या बांधकामापासून ते विजेच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले. त्यात शंभर रुपयांचा टॉयलेट पेपर चार हजार रुपयांना, बाथरुममधील आरसा 17 हजार 600 रुपयांना, तीनशे रुपयांचा साबून ठेवण्यासाठी डिस्पेंसर 10 हजार रुपयांना खरेदी करण्यात आला. प्रत्येक वस्तू 100 ते 200 टक्के जास्त दराने खरेदी झाली. कलमाडी यांनी कॉमनवेल्थ गेम्स आयोजनात हजारो कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला. स्पर्धा झाल्यानंतर 2011 मध्ये कलमाडी यांच्यावर गैरव्यवहाराचा गुन्हा नोंदविण्यात आला.


कलमाडी यांना अटक आणि राजकारण संपले

कलमाडी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर केंद्र सरकारने सीबीआयकडे तपास सोपविला. 25 एप्रिल 2011 रोजी कलमाडी यांना सीबीआयने अटक केली. कलमाडी यांना काँग्रेसमधून पक्षातून काढले. कलमाडी हे तब्बल नऊ महिने दिल्लीच्या तिहार तुरुंगात होते. त्याचकाळात ईडीने मनी लॉडरिंगचा गुन्हा नोंदविण्यात आला. तपासदरम्यान पुरावे न मिळाल्याने सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला. त्यामुळे सीबीआयकडून कलमाडी यांना क्लिनचिट मिळाली. हा रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला. तर ईडीकडून चौकशी सुरू होती. परंतु ईडीलाही पुरावले मिळाले नाहीत. त्यामुळे तब्बल चौदा वर्षांनंतर ईडीने मन लाँडरिंग प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. त्याचबरोबर कलमाडी यांचे सहकारी ललित भानोत, व्ही. के. वर्मा, शेखर देवरुखकर यांना दिलासा मिळाला.

एकेकाळी पुण्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या सुरेश कलमाडी यांचे राजकारण कॉमनवेल्थ गेम्सच्या गैरव्यवहाराचा आरोपाने संपले. पुण्यात काँग्रेसला वाली असलेला मोठा नेता राहिलेला नाही. कलमाडी हे आज 80 वर्षांचे आहेत. वृद्धपकाळात कलमाडींवर कोणताही डाग राहिलेला नाही नक्की. पण विरोधी पक्ष असताना भाजपने हे खटले उचलून धरले होते. परंतु त्यांच्याच सत्तेच्या काळात तिन्ही घोटाळ्याचा तपास होऊन गुन्हे सिध्द होऊ शकले नाही.

follow us