Download App

Girish Bapat : रोहित टिळक विरोधात, राहुल गांधी प्रचाराला आले, तरीही बापटांनी गड राखला

  • Written By: Last Updated:

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झाले आहे. बापट यांची प्रकृती खालावललल्याने त्यांना पुण्यातील दिनानाथ रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर बारकाईने नजर ठेवून होते. त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर आज सायंकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमी मध्ये अंत्यविधी होणार आहेत.

आज गल्ली ते दिल्ली अशी सर्वत्र सत्ता असलेल्या भाजपच्या जुन्या नेत्यांची नाव घ्यायची झाली, तर त्यामध्ये पुण्यातील भाजप नेते म्हणून गिरीश बापट यांच्या नावाची चर्चा होतेच. पुण्यातील महापालिका ते दिल्लीतील संसद असा मोठा राजकीय पल्ला गाठत असताना त्यांनी गेली पाच दशके पुण्यातील राजकीय-सामाजिक कामात त्यांनी स्वतःचा मोठा ठसा उमठवला होता.

आणीबाणीच्या काळात राजकारणात

आणीबाणीच्या काळात तुरुंगात शिक्षा भोगून आल्यानंतर गिरीश बापट यांच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली. १९८३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. सलग तीन टर्म त्यांनी नगरसेवकपद राखले. याचा काळात आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर गिरीश बापट महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते.

१९९५ मध्ये त्यांनी पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढविली अन्‌ निवडून आले. पुण्यातील कसबा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर पुढे सलग २०१४ पर्यंत ते पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले. दरम्यान १९९६ साली त्यांना भाजपाने पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. पण बापट यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे सुरेश कलमाडी खासदार झाले.

राज्यात सलग निवडून येत असताना त्यांनी पुण्यातील भाजपवर आपले वर्चस्व ठेवले होते. २०१४ साली राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले.देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्री केले गेलं, सोबतच पुण्याचं पालकमंत्री पदही त्यांना देण्यात आलं होत. २०१९ मध्ये त्यांना खासदारकीचे तिकीट देण्यात आलं. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल ९६ हजार मतांनी पराभव केला.

राहुल गांधी आले होते विरोधात प्रचाराला तरीही

गेले पाच वर्षे गिरीश बापट पुणे लोकसभा मतदार संघाचे खासदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले. पण गेल्या काही महिन्यापासून प्रकृती अस्वस्थतेमुळे ते सक्रियपणे काम करू शकत नव्हते. पण पुण्यात कसबा मतदारसंघात लागलेल्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी ते त्याही अवस्थेमध्ये आले होते. त्यावेळी असं सांगितलं गेलं की भाजपमधील वरिष्ठ नेतेच बापट यांनी पोटनिवडणुकीत हस्तक्षेप करावा अशी विनंती करत होते.

यामागे कारण असं सांगितलं गेलं की कसबा जिंकण्यासाठी गिरीश बापट असायला हवेत. ते असते तर निवडणूक सोपी गेली असती. कारण कसबा आणि पुण्याच्या राजकारणावर त्यांची पकड होती. याचं उदाहरण म्हणजे २००९ ची विधानसभा निवडणूक.

२००९ च्या विधानसभा निवडणुका होत्या, देशात राज्यात काँग्रेसची सत्ता होती. पुण्यातल्या तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी भाजपला म्हणजे गिरीश बापट यांना हरवून कसबा जिंकायचा असं ठरवलं. गिरीष बापट यांच्या विरोधात काँग्रेसने लोकमान्य टिळक यांच्या घरात म्हणजे रोहित टिळक यांना उमेदवारी दिली. त्यावेळी रोहित टिळक यांच्या प्रचाराला खुद्द राहुल गांधी आले.

देशात सर्वत्र काँग्रेसचा बोलबाला असताना कसब्याच्या प्रचारासाठी राहुल गांधी येणे मोठा विषय होता. त्यात स्वतः लोकमान्य टिळकांचा पणतू निवडणुकिला उभा राहतोय आणि नेहरूंचा पणतू प्रचाराला म्हणल्यावर ही निवडणुक रोहित टिळक मोठ्या मतांनी खिशात घातलील असं वाटत होतं. पण गिरीश बापट आपल्या नेहमीच्या पध्द्तीने निवडणुकीला सामोरे गेले. आपला असलेल्या लोकांशी थेट संपर्कच्या जोरावर त्यांनी निवडणूक जिंकूनही दाखवली.

काँग्रेसला आणि काँग्रेसच्या नेत्यांना पुन्हा एकदा गिरीश बापट यांनी आपला करिष्मा दाखवून दिला. गिरीष बापट मोठ्या फरकाने विजयी झालेच पण राहुल गांधी स्वतः प्रचाराला येऊनही रोहित टिळक चक्क तिसऱ्या क्रमांकावर गेले. दुसऱ्या क्रमांकावर कोण होत हे आता नव्याने सांगायचं झालं तर नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत आमदार झालेले रवींद्र धंगेकर दुसऱ्या क्रमांकावर होते.

Tags

follow us