मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी ग्लोबल स्पिरिच्युअल लिडरशिप अवॉर्डने सन्मानित
डॉ. दीपक हारके यांच्या हस्ते सुप्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी यांना या ग्लोबल स्पिरिच्युअल लीडरशिप अवार्डने सन्मानित करण्यात आले.
Global Spiritual Leadership Award : विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या वतीने देशभरात नावलौकिक असलेल्या अध्यात्मिक आणि मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी (Jaya Kishori) यांना त्यांच्या अध्यात्मिक प्रवचनं आणि भजनांसाठी देशभरात ओळखलं जातं. त्याचप्रमाणं किशोरी जी आणि आधुनिक युगातील मीरा म्हणून देखील त्यांची ओळख आहे. सोशल मीडियावर त्यांच्या मोटिव्हहेशनल व्हिडिओ आणि अध्यात्मिक प्रवचनांमुळे तरुण पिढीमध्ये देखील त्या लोकप्रिय आहेत. त्या समाजात जनजागृती घडवण्यासाठी प्रेरणादायी भाषणं देतात, त्याचप्रमाणं त्यांची भावपूर्ण भजनं देखील श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असतात. अशा जया किशोरी यांना ग्लोबल लीडरशिप अवार्डने (Global Spiritual Leadership Award) सन्मानित करण्यात आले.
कोपरगावमधील रस्ता, पुलासाठी 27 कोटी रुपयांचा निधी; आमदार आशुतोष काळे यांची माहिती
विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या चेअरमन मिस इंडिया डॉ. इशा अगरवाल (Dr. Isha Agrwal) आणि तब्बल १८३ वर्ल्ड रेकॉर्ड करणारे पहिले भारतीय डॉ. दीपक हारके यांच्या हस्ते सुप्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी यांना या ग्लोबल स्पिरिच्युअल लीडरशिप अवार्डने सन्मानित करण्यात आले.
