Download App

गिरीश बापट अधिकाऱ्यांना नडले ! अनेकांना सरळ केले

  • Written By: Last Updated:

अहमदनगरः गिरीश बापट यांना २०१४ च्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्यावर होती. राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी हे खाते तेवढेच महत्त्वाचे होते. स्वस्त धान्य दुकानातून धान्याचा मोठा अपहार होण्याचे प्रकार उघडकीस येतात. बापट यांच्या काळात धान्य दुकानातील गैरव्यवहार कोट्यवधीचे प्रकरणी उघडकीस आले होते. त्यात नाशिकमधील प्रकरण कोट्यवधी रुपयांचे होते. त्यात अनेक अधिकारी अडकले होते. त्यांनी अधिकाऱ्यांना निलंबित केले. पण महसूल विभागातील अधिकारी थेट त्यांच्याविरोधात गेले होते. तर काही ठिकाणी थेट स्वस्त धान्य दुकानदारांनी बापट यांच्याविरोधात कोर्टात दावे दाखल केले होते. तर विरोधकांनी हे प्रकरणे उचलत गिरीश बापटांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. पण त्यातील एकही आरोप सिध्द होऊ शकला नाही.

Devendra Fadanvis यांना अश्रू अनावर : गिरीशभाऊ आमच्यासाठी जेवण बनवायचे…

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील रेशनिंगवरील साखर, गहू, तांदूळ परस्पर विक्रीचा एक घोटाळा उघडकीस आला होता. २०१५ मध्ये हा घोटाळा उघडकीस आला होता. तब्बल ३१ हजार क्विंटल धान्याचा हा घोटाळा होता. या घोटाळ्यावरून विरोधकांनी सभागृहात बापट यांना घेरले होते. बापट यांनी सात तहसीलदार आणि सहा कर्मचारी निलंबित केले होते. राज्यात पहिल्यांदा पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई झाली होती. बापट यांच्या कारवाईमुळे पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी धसका घेतला होता. या घोटाळ्याची अजूनही चौकशी सुरू आहे.

पुरवठा विभागातील अधिकारी हे तहसीलदार दर्जाचे असतात. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांविरोधात त्यांच्याविरोधात थेट काम बंद करण्याचा इशारा दिला होता. काही ठिकाणी काम बंद आंदोलन केले होते. हिंगोली, जळगाव जिल्ह्यात असे घोटाळे उघडकीस आल्यानंतर बापट यांनी थेट अधिकाऱ्यांवर थेट कारवाई केली होती. तसेच अनेक दुकानांचे परवाने निलंबित केले होते.

हे दुकानदार थेट हायकोर्टात बापटांविरोधात गेले होते. तर बापटांनी काही परवाने बेकायदेशीर दिल्याचे आरोप त्यांच्यावर विरोधकांनी केला होता. तर चंद्रपूर येथील एका प्रकरणात बापट यांना न्यायालयाने दहा हजार रुपयांचा दंड केला होता. तर काही दुकानदारांना परवाने पुन्हा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यामुळे अनेक कारणांमुळे बापटांचे मंत्रिपद गाजत होते. विरोध घेरत असताना बापट यांच्याकडून गैरव्यवहार करणाऱ्यांविरोधात कारवाई, छापेमारी सुरू होती. त्यात काळात बापट हे सर्वाधिक गाजत होते. शांत स्वभावी बापट हे कारवाई करण्याबाबत मात्र मागे-पुढे पाहत नव्हते.

‘भाऊंची आलेली चिठ्ठी म्हणजे आयुष्याचा ठेवा’, कार्यकर्त्याने जागवल्या आठवणी

राज्यात तूरडाळीचा तुटवडा निर्माण झाला होता. तब्बल दोनशे रुपये किलोने डाळ विकली जात होती. डाळीचा काळाबाजार होऊ नये म्हणून छापेमारी झाली होती. पुरवठा विभागाने जप्त केलेल्या डाळीच्या लिलावात दोन हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप बापट यांच्यावर राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रवक्ते नवाब मलिक यांना केला होता. तर तेव्हा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले धनंजय मुंडे यांनी बापट यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितला होता. त्यावेळी भाजपमध्ये असलेले एकनाथ खडसे यांनीही बापट यांना घेरले होते. पुरवठा विभागात केवळ जळगावमध्येच शंभर कोटीचा घोटाळ्याचा आरोप झाला होता. कोट्यवधी रुपयांची आरोप झाले तर बापट हे डगमगले नव्हते. त्यातील एकही घोटाळा विरोधक सिध्द करू शकले नाहीत.

Tags

follow us