मविआ नेत्यांसोबत राज ठाकरेही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार, फडणवीस, शिंदेंनाही निमंत्रण, राऊतांची माहिती

Raj Thackeray Meet Chief Electoral Officer with MVA निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीमध्ये राज ठाकरेंची उपस्थिती महत्त्वाची आहे.

Untitled Design (7)

Untitled Design (7)

Raj Thackeray will Meet Chief Electoral Officer with MVA , Raut says Fadnavis and Shinde also invited : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. यामध्ये आता महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ निवडणूक आयोAdd Media Fileगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. विशेष म्हणजे या भेटीमध्ये होणाऱ्या बैठकीला मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे देखील उपस्थिती असणार आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरू असताना राज ठाकरेंची उपस्थिती महत्त्वाची मानली जात आहे.

ट्रम्प यांचा चीनवर पुन्हा अतिरिक्त 100 टक्के टॅरिफ! अमेरिकेचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणुकदारांनी दीड लाख कोटी डॉलर्स गमावले

14 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीकडून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची ही भेट घेतली जाणार आहे. यावेळी सर्वपक्षीय शिष्टमंडळ या भेटीसाठी उपस्थित असणार आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हर्षवर्धन सपकाळ यांचा समावेश असून या बैठकीसाठी विरोधकांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील निमंत्रण देण्यात आल्याची माहिती संजय राऊत यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.

https://x.com/rautsanjay61/status/1976841989384532154?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1976841989384532154%7Ctwgr%5E8816593c1023a563c49b0191e61a56827ada2425%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Fpolitics%2Fsanjay-raut-raj-thackeray-sharad-pawar-uddhav-thackeray-mahavikas-aghadi-leaders-will-meet-chief-electoral-officer-devendra-fadnavis-eknath-shinde-also-invited-1391187

Video : विधानसभा निवडणुकीत 20 हजार मतदान बाहेरुन आणलं; शिंदेचे आमदार हे काय बोलले?

त्याचबरोबर याबाबत राहू त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, निवडणूक आयोगाला भेटणे ही आता एक औपचारिकता आहे. तरी देखील लोकशाही व्यवस्थेतील या सर्वोच्च संस्थेची संवाद ठेवायला हवा. यासाठी 14 ऑक्टोबर रोजी 12 वाजून 30 मिनिटांनी राज्यातील सर्व पक्ष नेत्यांचे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेणार आहे. यामध्ये फडणवीस यांनी देखील सहभागी व्हावं. अशी विनंती आम्ही केली आहे. कारण ही भेट म्हणजे राजकारण नाही तर लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न आहे. भाजपने त्यांना देखील कित्येकदा याचा त्रास जाणवत असेल. या भेटीनंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सर्व नेत्यांची पत्रकार परिषद होणार आहे.

 

Exit mobile version