MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक!

Raj Thackeray On MPSC Students; राज ठाकरे यांनी एक पोस्ट करुन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना लवकरच चांगली बातमी येणार, अशी माहिती दिली आहे.

Raj Thackeray On MPSC Students

Raj Thackeray On MPSC Students: पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं एस.एम. जोशी पुलावर आंदोलन सुरु आहे. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) करत आहेत. जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलनाची जागा सोडणार नाही, असा ठाम निर्धार विद्यार्थी आणि रोहित पवारांनी केला आहे. पण पोलिसांनी एस.एम. जोशी पुल परिसर मोकळा करा असं विद्यार्थ्यांना सांगितलं होतं. याच दरम्यान एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक पोस्ट करुन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना लवकरच चांगली बातमी येणार, अशी माहिती दिली आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली.

‘दीपाली ताई, एपस्टीन फाईल्स आणा, आम्हाला खरातबाबा बघायचाय’; विवेकानंद बोलला अन् दीपली सय्यद पाहतच राहिल्या!

राज ठाकरेंची पोस्ट

राज ठाकरे यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केल्याची माहिती दिली. 5 ऑक्टोबर 2026 रोजी पुण्यात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि रास्त अपेक्षा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले होते. नोकरीसाठी स्वतःचा जिल्हा, तालुका, घर आणि कुटुंब सोडून संघर्ष करणाऱ्या तरुण-तरुणींना पाहून मनाला वेदना होतात, असेही त्यांनी म्हटले. या विषयावर मुख्यमंत्र्यांशी झालेली चर्चा सकारात्मक झाली असून, येत्या काही दिवसांत एमपीएससी विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांसंदर्भात चांगली बातमी मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संयम राखावा, असे आवाहनही राज ठाकरे यांनी पोस्टमधून केले.

 

‘देवानंच त्याचा जीव घेतलाय’, नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताचं धक्कादायक वक्तव्य

राज ठाकरे आंदोलनस्थळावरून विद्यार्थ्यांना काय म्हणाले?

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हजेरी लावत विद्यार्थ्यांना भरती प्रक्रियेबाबत वस्तुस्थिती समजावून सांगितली होती. दुसरं कोणतंही सरकार सत्तेत आलं, तरी 70 हजार पदांची भरती होणार नाही, असे स्पष्ट मत त्यांनी रोहित पवार यांच्यासमोर मांडले होते. यापूर्वी 2023 मध्ये मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या मंचावरही राज ठाकरे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. आरक्षणाचा प्रश्न आंदोलनातून नव्हे, तर न्यायालयीन प्रक्रियेतून सुटू शकतो, असे त्यांनी म्हटले होते. आपण मांडलेली भूमिका सुरुवातीला कटू वाटते, पण ती लोकांना हळूहळू समजते, असे राज ठाकरे यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले होते.

अंबानी हेच भारताचे खरे बॉस आहेत का? स्टारलिंकला परवान्यावरून एलन मस्क यांचा सरकारला सवाल

दरम्यान, आता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली असून, मुख्यमंत्री या विषयावर सकारात्मक असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांसंदर्भात चांगली बातमी येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

follow us