उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा आज छत्रपती संभाजीनगर येथे गटनेत्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात स्वत: एकनाथ शिंदे उपस्थित होते. तसंच, मंत्री संजय शिरसाट हे देखील उपस्थित होते. (Shiv Sena) या कार्यक्रमात भाषण करताना पैठणचे शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांनी धक्कादायक वक्तव्य केलं.
विलास भुमरे यांच्या वक्तव्याची आता चर्चा होत आहे. विधानसभा निवडणुकीत 20 हजार मतदार बाहेरून आणले, असं वक्तव्य विलास भुमरे यांनी केलं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी इशारा करताच त्यांनी सारवासारव करत मतदान बाहेरुन आणले म्हणजे स्थलांतरीत केल्याचं ते म्हणाले. हे वक्तव्य केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना इशारा केला. यानंतर संजय शिरसाट हसत बोलू लागले. त्यांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव केली.
आधीचे मुख्यमंत्री केवळ ऑनलाईनच दिसायचे; खासदार भुमरेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
विधानसभा निवडणुकीच्या वेळेला जवळपास 20 हजार मतदान मी बाहेरुन आणलं. मला त्या निवडणुकीचा शंभर टक्के फायदा झाला. माझ्या मतदारसंघातील 20 हजार मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते. त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो”, असं वक्तव्य विलास भुमरे यांनी केलं. विलास भुमरे यांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “विलास भुमरे यांनी 1 लाखाची मदत शेतकरी आत्महत्याला दिली.
ती बातमी लावा. 20 हजार मतदाराचा त्यांनी खुलासा देखील केला. त्यांच्या मतदारसंघाच्या बाहेर जी नावे गेलेली आहे ती त्यांनी आणली. त्यांनी खुलासाही केला. चांगली बातमी तुम्ही दाखवत नाही. उद्धव ठाकरे सेनेचे लोक आले होते की शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबाला एक लाख पाठवते त्यांनी दिले नाही. त्याच कुटुंबाला विलास भुमरे यांनी 1 लाख रुपये पाठवले, बांधिलकी जपणाऱ्या माणसासोबत तरी असे करू नका”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
विलास भुमरे यांच्या वक्तव्याची आता चर्चा होत आहे. विधानसभा निवडणुकीत 20 हजार मतदार बाहेरून आणले, असं वक्तव्य विलास भुमरे यांनी केलं. एकनाथ शिंदे यांनी इशारा करताच त्यांनी सारवासारव करत मतदान बाहेरुन आणले म्हणजे स्थलांतरीत केल्याचं ते म्हणाले.@vilasbhumare555 @mieknathshinde pic.twitter.com/Lp3Ek9RhqO
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) October 10, 2025