आधीचे मुख्यमंत्री केवळ ऑनलाईनच दिसायचे…; खासदार भुमरेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

आधीचे मुख्यमंत्री केवळ ऑनलाईनच दिसायचे…; खासदार भुमरेंचे उद्धव ठाकरेंवर  टीकास्त्र

Sandipan Bhumre on Uddhav Thackeray : आधीचे मुख्यमंञी केवळ ऑनलाईन दिसायचे,  त्यामुळे आम्हाला उठाव करावा लागला. आमच्यावर खोके – बोकेंचा आरोपही झाला. मात्र, हा उठाव केल्यामुळेच जनतेला न्याय देता आला. आम्ही शिवसेनेशी प्रामाणिक राहून हातात झेंडे धरले. केसेस अंगावर घेतल्या आणि सत्ता आल्यावर आम्हाला चांगले मंञीपदं देण्यापेक्षा खोके बहाद्दरांना दिले गेले, अशी खोचक टीका छञपती संभाजीनगरचे खासदा संदिपान भुमरेंनी (Sandipan Bhumre)  ठाकरे गटाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर  (Uddhav Thackeray) केली.

केबिनमध्ये बोलावून…, बीड विनयभंग प्रकरणातल्या विजय पवारचा आणखी एक कारनामा समोर 

भुमरे शिरसगांव (ता.नेवासा) येथे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. ते म्हणाले की, त्यावेळचे ऑनलाईन दिसणाऱ्या मुख्यमंत्री कधी आमच्याशी बोललेच नाही, त्यामुळे आम्हाला हा उठाव करवा लागला आणि आमचा उठाव हा जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सत्कारणी लागला. मला मिळालेल्या मंञीपदाचे सोने करत शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय दिल्याचे आत्मिक समाधान मला आहे, असंही ते म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार डॉ. सुजय विखे – पाटील, माजी आमदार पांडूरंग अभंग, पंचगंगा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा प्रभाकर (काका) शिंदे, काशिनाथ नवले, सिद्धांत नवले – पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, किसनराव गडाख, भाजपाचे नेते सचिन देसरडा, ऋषीकेश शेटे, दत्तु नाना पोटे, हरिभाऊ लंघे, डॉ.तेजेश्री लंघे, शंकरराव लोखंडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश डिके, अंकुशराव काळे, राजेंद्र पोटे, अशोकराव मिसाळ, सुनिलराव वाघमारे, ज्ञानेश्वर पेचे, ञिमुर्ती शैक्षणिक संकुलाच्या उपाध्यक्ष अॅड.स्नेहल चव्हाण – घाडगे पाटील, दादा विधाटे प्रताप चिंधे, भाऊसाहेब वाघ यांच्यासह विविध सामाजिक,धार्मिक आणि राजकिय क्षेञातील मान्यवर उपस्थित होते.

ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांवर मकोका लागणार, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा 

खासदार संदिपान भुमरे पुढे म्हणाले की, माझ्या सारख्या सर्वसामान्य माणसाला शिवसेनेचे सर्वेसर्वा राज्याचे उपमुख्यमंञी एकनाथ शिंदेंनी मोठे केले. आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या मागे तर विखे कुटूंबियांची भक्कम साथ असल्यामुळे त्यांना लवकरच लाल दिवाही मिळू शकतो, असा आशावाद भुमरे यांनी व्यक्त केला.

डॉ.सुजय विखे – पाटील म्हणाले की, आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांना वेळोवेळी मोठी राजकीय संधी आलेली असतांनाही त्यांनी ती सोडून दिल्यामुळे दुसऱ्यांनीच या संधीचा लाभ उठवला अन् आमदार झाले. या विधानसभा निवडणुकीमध्ये विठ्ठलराव लंघे – पाटलांना मदत करण्यापेक्षा त्यांना पाडण्यासाठी काहीजण सुपारी घेवून रिंगणात उतरले होते, अशी अप्रत्यक्षपणे टीका माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर केली.

यावेळी सत्काराला उत्तर देतांना आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील बोलतांना म्हणाले की, माझ्या स्वभावात कधीही बदल होणार नाही. सर्वसामान्य जनतेने आणि माझ्या लाडक्या बहिनींमुळे मला ही संधी मिळालेली असून या संधीचे ‘मी’ सोने करुन जनसामान्यांच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मी तुमच्या सारखाच सर्वसामान्य माणूस असून तुम्ही मला कधीही भेटू शकता, आधीच्या आमदारांना भेटण्यासाठी सात पडदे ओलांडून जावे लागत होते. आता मला भेटण्यासाठी अशी गरज भासणार नाही, असं सांगत शैनेश्वर देवस्थानचा अॅप घोटाळ्याबाबत आपण विधानसभेत आवाज उठविणार असून घोटाळेबाज लोकांसह मास्टरमाईंडचे काळे बुरखे फाडणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube