Lok Sabha Speaker Post : कोण होणार लोकसभा अध्यक्ष? हा प्रश्न दिवसेंदिवस जटील (Lok Sabha Speaker) होत चालला आहे. कोणत्याही परिस्थितीत स्पीकर पद आपल्याकडेच राहावे यासाठी भाजप जोरदार (BJP) प्रयत्न करत आहे. यासाठी एनडीएतील घटक (NDA Government) पक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना (Rajnath Singh) यांना देण्यात आली आहे. येत्या 24 जून रोजी संसदेचे विशेष सत्र सुरू होणार (Parliament Session) आहे. त्याआधी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडली. सत्र कशा पद्धतीने चालेल यावर चर्चा करण्यात आली मात्र सर्वांच्या नजरा स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर कोण होणार याकडे लागल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपला (Lok Sabha Election) बहुमत मिळाल नाही. त्यामुळे टीडीपी आणि जेडीयू (JDU) यांना सोबत घेत सरकार स्थापन करण्यात आले. 9 जून रोजी नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता 26 जून रोजी स्पष्ट होईल की लोकसभेचा अध्यक्ष कोण होईल. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी भाजपने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना नियुक्त केले आहे. त्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला जेपी नड्डा, किरेन रिजिजू, राम मोहन नायडू, चिराग पासवान, लल्लन सिंह उपस्थित होते.
स्पीकर पदावर चंद्राबाबूंचा डोळा पण, 1999 चा ‘कटू’ अनुभव भाजप विसरणार का?
जेडीयूने याआधीच स्पष्टीकरण दिले आहे. पक्षाचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी सांगितले की एनडीएतील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. जो पक्ष सर्वात मोठा असेल त्याचाच अध्यक्ष पदावर पहिला अधिकार असतो. त्यामुळे भाजपचा या पदावर अधिकार आहे. याबाबतीत आमचे धोरण एकदम स्पष्ट आहे आणि एनडीए कमकुवत होईल असे आम्ही इच्छित नाही.
खरंतर भाजपात कोणत्याही पदासाठी ज्या नावांची चर्चा असते त्यांची नावे यादीत कोठेच नसतात. आणि ऐनवेळी सर्वांनाच चकित करणारी नाव समोर येतात. अशा परिस्थितीत स्पीकर पदासाठी उमेदवार कोण असेल याचा अंदाज आतापासूनच लावला जात आहे. दरम्यान, या पदासाठी माजी अध्यक्ष ओम बिर्ला आणि डी. पुरंदेश्वरी यांची नावे सध्या चर्चेत आहेत. टीडीपीने याआधीच लोकसभेचा स्पीकर पदाचा उमेदवार सर्वसंमतीने निवडला जावा असे सांगत भाजपाचे टेन्शन वाढवले होतेच. त्यात आता विरोधकांकडून ऑफर दिल्या जात असल्याने ऐनवेळी काही खेला होणार का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
आता यामध्ये खोडा घालून एनडीए सरकारला अस्थिर करण्याचा उद्योग विरोधकांनी सुरू केला आहे. स्पीकर पदासाठी जेडीयू आणि टीडीपीने प्रयत्न करावेत असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. खासदार संजय राऊत यांनी आधीच सांगितलं आहे की जर टीडीपीने उमेदवार दिला तर इंडिया आघाडी पाठिंबा देईल. लोकसभेतील नंबर गेमचा विचार केला तर एनडीएकडे 293 खासदारांचे समर्थन आहे तर इंडिया आघाडीकडे फक्त 233 खासदार आहेत.
लोकसभा अध्यक्षपदाचा तिढा ? नितीशकुमारांचा भाजपला पाठिंबा पण, ‘टीडीपी’ची भूमिका वेगळीच