Download App

NDA सरकार 5 वर्ष टिकेल, मंत्रिपदावरून मतभेद नाहीत, येत्या जुलैपर्यंत… ; अजितदादा स्पष्टच बोलले

पक्षात किंवा महायुतीत मंत्रिपदावरून कोणतेही मतभेद नाहीत. कारण नसतांना माध्यमे काहीवेळा अशा अफवा पसरतात. - अजित पवार

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar Speech : काल मोदींच्या मंत्रिमंडळात (Modis Cabinet) शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांन मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, एनडीएतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाला एकही मंत्रीपद देण्यात आलं नाही. त्यामुळं अजित पवार (Ajit Pawar) गटात नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आता पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांनी भाष्य केलं.

Breaking News: एनडीएचे खातेवाटप; अमित शाहांकडे गृह, नितीन गडकरींकडे पुन्हा रस्ते वाहतूक 

अजित पवार गटाचा आज मुंबईत वर्धापन दिन साजरा झाला. या कार्यक्रमात बोलतांना अजित पवार म्हणाले, गेली 24 वर्ष शरद पवार पक्षाचे जे नेतृत्व केलं, त्याबद्दल आज मी पक्षाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो. यासह पक्षाच्या यशात संगमा यांच्यासारख्या अनेक नेत्यांचे योगदान आहे, त्या सर्वांचेही मी आभार मानतो, असं अजित पवार म्हणाले.

मंत्रिपदावरून कोणतेही मतभेद नाहीत
पुढं बोलतांना ते म्हणाले की, मी काल दिल्लीत होतो. माझ्यासोबत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, समीर भुजबळ हे सगळे नेते होते. काल दिवसभर आम्ही एकत्र होतो. आम्ही अनेक विषयांवर चर्चा केली. या चर्चेनंतर मी ठामपणे सांगतो की, पक्षात किंवा महायुतीत मंत्रिपदावरून कोणतेही मतभेद नाहीत. कारण नसतांना माध्यमे काहीवेळा अशा अफवा पसरतात. जर माध्यमांशी संवाद साधला तर त्यातून वेगवेगळ्या बातम्या आणि गैरसमज पसरतात आणि माध्यमांशी बातचीत केली नाहीत तर त्यांना असं वाटतं आमच्याशी बोलत नाहीत. कालही अशाच आपल्या पक्षाबाबत काही बातम्या पसरवल्या गेल्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि मी देखील या अफवांच खंडन केलं.

अटल बिहारी वाजपेयी हॉस्पिटममध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला 1,85,000 रुपये पगार 

पुढं बोलतांना ते म्हणाले की, आपला राज्यभेवर एक सदस्य आहे आणि सुनील तटकरे यांच्या रूपाने लोकसभेत एक सदस्य आहे. मी सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की येत्या जुलै किंवा 15 ऑगस्टपर्यंत आपले राज्यसभेत तीन सदस्य असतील, असं अजित पवार म्हणाले.

एनडीचं सरकार पाच वर्ष टिकेल
ते म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालासंदर्भातील अनेकांचे अंदाज चुकले. आपण लढण्याचा चांगला प्रयत्न केला. मात्र, आपल्याला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही. मात्र, एनडीचं सरकार पाच वर्ष टिकेल, असा विश्वासही अजित पवारांनी व्यक्त केला.

follow us

वेब स्टोरीज