अटल बिहारी वाजपेयी हॉस्पिटममध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला 1,85,000 रुपये पगार

अटल बिहारी वाजपेयी हॉस्पिटममध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला 1,85,000 रुपये पगार

BAVMC Pune Recruitment 2024 : आज अनेकजण नोकरीच्या (job) शोधात आहेत. दरम्यान, तुमचं वैद्यकीय शिक्षण झालं असेल आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, पुण्यातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज (Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College) आणि हॉस्पिटलमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. दरम्यान, या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय? वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? याच विषयी जाणून घेऊ.

Government Schemes : वैवाहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ कोणाला घेता येईल? 

एकूण पदे – 78

पदांचा तपशील
प्राध्यापक पदासाठी एकूण 5 पदे रिक्त आहेत.
सहयोगी प्राध्यापक पदासाठी एकूण 11 जागा रिक्त आहेत.
सहाय्यक प्राध्यापक पदासाठी एकूण 16 जागा रिक्त आहेत.
कनिष्ठ निवासी पदासाठी एकूण 24 पदे रिक्त आहेत.
वरिष्ठ निवासी पदासाठी एकूण 22 जागा रिक्त आहेत.

शैक्षणिक पात्रता
1. प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयात MD/MS/DNB ची पदवी असणे आवश्यक आहे.
2. असोसिएट प्रोफेसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयात MD/MS/DNB ची पदवी असणे आवश्यक आहे.
3. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयात MD/MS/DNB असणे आवश्यक आहे.
4. कनिष्ठ निवासी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांने कोणत्याही मान्यताप्राप्त वैद्यकीय विद्यापीठातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलेले असावा.
5. वरिष्ठ निवासी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयातमधील ब्रॉड स्पेशालिटीमध्ये MD/MS/DNB पोस्ट ग्रॅज्युएशन असं शिक्षण असणं आवश्यक आहे.

‘सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा अन्…’; पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा ठराव

पगार
1. प्राध्यापक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना रु. 1,85,000/- पगार दिला जाईल.
2. असोसिएट प्रोफेसर पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना रु. 1,70,000/- पगार दिला जाईल.
3. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना रु 1,00,000/- मानधन दिले जाईल.
4. कनिष्ठ निवासी पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा रुपये 64,551/- दिले जातील.
5. वरिष्ठ निवासी पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा रुपये 80,250/- वेतन दिले जाईल.

अधिकृत वेबसाइट लिंक –

Home

अधिसूचना लिंक –
https://www.bavmcpune.edu.in/wp-content/uploads/2024/06/Recruitment_Advt_-07.06.2024.pdf

अर्ज आणि अर्ज प्रक्रिया-
उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसहअधिसूचनेमध्ये दिलेला फॉर्म भरून त्यासह सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून 2 तास आधी मुलाखतीला हजर राहावे लागेल. अर्जात उमेदवारांनी आपली वयोमर्यादा नमूद करावी.

मुलाखतीच्या तारखा –
उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी 13 जून 2024 आणि 27 जून 2024 रोजी दुपारी 3 वाजता मुलाखत होणार आहे. तर कनिष्ठ निवासी, वरिष्ठ निवासी या पदांसाठी 13 जून 2024 आणि 27 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखत होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज