Bihar Politics : बिहारच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप (Bihar Politics) झाला आहे. सत्ताधारी जेडीयू पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वाची बैठक आज नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीत ललन सिंह यांनी राजीनामा दिला. यानंतर आता बिहारचे मु्ख्यमंत्री नितीश कुमार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. ललन सिंह पदाचा राजीनामा देणार अशा चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होत्या. अखेर या चर्चा खऱ्या असल्याचे आज स्पष्ट झाले. ललन सिंह यांच्या राजीनाम्याच्या निर्णयाची माहिती बिहारचे कॅबिनेट मंत्री विजयकुमार चौधरी यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
Bihar Cast Survey : फक्त 7 टक्के ‘ग्रॅज्यूएट’, 25 टक्के सवर्ण गरीब; बिहारची आकडेवारी धक्कादायक
लल्लन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर नीतीश कुमार यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. दिल्लीतील बैठकीवेळी कार्यकर्त्यांनी देश का पीएम कैसा हो नीतीश कुमार जैसा हो, अशा घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांनी सांगितले की नीतीश कुमार आणि लल्लन सिंह यांच्यात काही अंतर नाही. देशात आता लोकसभा निवडणुका होणार आहेत त्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.
सन 2003 पासून आतापर्यंत नीतीश कुमार पाचव्यांदा जनता दल संयुक्तचे (जेडीयू) अध्यक्ष असतील. सर्वात आधी सन 2016 मध्ये शरद यादव पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यानंतर नीतीश कुमार अध्यक्ष झाले होते. नीतीश कुमार यांच्यानंतर आरसीपी सिंह यांना अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. आरसीपी सिंह यांच्यानंतर लल्लन सिंह राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. आता मात्र लल्लन सिंह राजीनामा देण्याच्या मानसिकतेत नव्हते. मला बाजूला केले तर इंडिया आघाडीत चुकीचा संदेश जाईल असे त्यांचे म्हणणे होते. मात्र पक्षातील अन्य नेत्यांनी नीतीश कुमार हेच राष्ट्रीय अध्यक्ष व्हावेत असे वाटत असल्याने लल्लन सिंह यांना अध्यक्षपद सोडावे लागले.
Main Atal Hoon: अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेसाठी पंकज त्रिपाठींनी 60 दिवस फक्त खिचडी खाल्ली
नीतीश कुमारांचा प्लॅन यशस्वी – जीतन राम मांझी
या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी खोचक शब्दांत नीतीश कुमार यांना टोला लगावला. ते म्हणाले, नीतीश कुमार यांच्या तीन वर्षांच्या योजनेनुसार लल्लन सिंह यांना बाजूला करण्यात आले. लल्लन सिंह यांच्या लक्षात यायला हवे होते की नीतीश कुमारांनी जॉर्ज फर्नाांडिस यांच्यावर कधी विचार केला नाही. आरसीपी सिंह, शरद यादव, दिग्विजय सिंह असे कुणीच नाही ज्यांच्याबरोबर नीतीश कुमारांनी विश्वासघात केला नसेल.