Download App

पराभूत उमेदवारांना ईव्हीएमवर संशय…नगर जिल्ह्यातून एवढे अर्ज, भाजपच्या उमेदवारांची मागणी

  • Written By: Last Updated:

Maharashtra Assembly Election 2024 Defeated candidates : अहिल्यानगर – राज्यात विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) या पार पडल्यात. यामध्ये महाविकास आघाडीचा राज्यात सुपडासाफ झाला. या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. पराभूत झालेल्या अनेक उमेदवारांनी आता ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. याला नगर जिल्हा देखील अपवाद राहिलेला नाही. नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदार संघातून तब्बल दहा मतदार संघातील पराभूत उमेदवारांनी फेर पडताळणीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे आघाडीतील पराभूत उमेदवारांबरोबरच महायुतीमधील एका उमेदवाराने अशीच मागणी केली आहे. यामुळे नगर जिल्ह्यात एकच राजकीय चर्चांना उधाण आले आहे. नेमके कोण कोणत्या मतदार संघातून कोणी ईव्हीएमवर (EVM) संशय व्यक्त केला? तसेच फेर पडताळणीची मागणी केली आहे ते आपण पाहू…

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता विरोधकांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात असल्याने विरोधकांनी आता त्या विरोधात मोहीम सुरु केलीय. ईव्हीएममध्ये काही तरी फेरफार असल्याचा संशय पराभूत उमेदवारांनी व्यक्त केला आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे ईव्हीएमवर संशय असणाऱ्या आमदारांमध्ये कर्जत जामखेडमध्ये पराभूत झालेले भाजप नेते (Assembly Election 2024 Defeated candidates) तसेच माजी मंत्री राम शिंदे यांचाही समावेश आहे. नगर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यातील बारा पैकी तब्बल दहा मतदार संघातून ईव्हीएम पडताळणीची मागणी करण्यात आलेली आहे. तर यामध्ये केवळ अकोले व श्रीरामपूर मधून अद्याप अर्ज करण्यात आलेला नाही.

महायुतीच्या विजयात आमचा मोठा वाटा; आम्हाला गृह खाते देण्यास विरोध का?, काय म्हणाले शिरसाट?

नगर जिल्ह्यातही (Ahilyanagar) ईव्हीएम यंत्राबाबत संशय घेतला जात आहे. विधानसभेची निवडणूक लढविलेल्या तब्बल दहा उमेदवारांनी ‘ईव्हीएम’ मशिन पडताळणीसाठी अर्ज केले आहेत. त्यात सत्ताधारी पराभूत उमेदवारांचाही समावेश आहे. अभिषेक कळमकर (अहमदनगर शहर), प्रभावती घोगरे (शिर्डी), राहुल जगताप (श्रीगोंदे) आणि प्रताप ढाकणे (शेवगाव-पाथर्डी), शंकरराव गडाख (नेवासे) या पाच उमेदवारांनी शुक्रवारी (ता.२९) शेवटच्या दिवशी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे अर्ज दाखल केले.

नगर शहर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांनी सावेडी, बोल्हेगाव, चाहुराणा बुद्रुक या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशिन पडताळणीसाठी अर्ज केला आहे. तर श्रीगोंदे मतदार संघातील अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी दोन मतदान केंद्रावरील पडताळणी अर्ज केला आहे. यामध्ये चिचोंडी पाटील (ता. श्रीगोंदे), पेडगाव (ता. श्रीगोंदे) या मतदान केंद्राचा समावेश आहे.
तर शिर्डीतुन काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांनी देखील साकुर आणि लोणी खुर्द (ता. राहाता) या ठिकाणाहून पडताळणीसाठी अर्ज केला आहे. तसेच शेवगाव – पाथर्डी मतदारसंघामधून प्रताप ढाकणे यांनी शिरसाठवाडी व मोहटा (ता. पाथर्डी) मतदान केंद्राची पडताळणीसाठी अर्ज केला आहे. नेवासे मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार शंकरराव गडाख यांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलेला आहे.

आयएम अल्सो द इंजिनिअर, EVM हॅक करता येतं I Know दॅट; जानकरांच्या दाव्याने खळबळ

नगर जिल्ह्यातून 10 उमेदवारांचे अर्ज

प्राजक्त तनपुरे (राहुरी), संदीप वर्पे (कोपरगाव) यांनी बुधवारी अर्ज दाखल केले. बाळासाहेब थोरात (संगमनेर), राणी लंके (पारनेर), प्रा. राम शिंदे (कर्जत-जामखेड) यांनी गुरूवारी (ता.२८) अर्ज दाखल केले. अभिषेक कळमकर (अहमदनगर शहर), प्रभावती घोगरे (शिर्डी), राहुल जगताप (श्रीगोंदे) आणि प्रताप ढाकणे (शेवगाव-पाथर्डी), शंकरराव गडाख (नेवासे) या पाच उमेदवारांनी शुक्रवारी (ता. २९) अर्ज दाखल केले आहेत.

फेर पडताळणीची पद्धत जाणून घ्या…

निवडणूक आयोगाकडून ईव्हीएमच्या पडताळणीसाठी तारीख आणि वेळ निश्चित करून दिली जाणार आहे. तसेच आयोगाच्या निर्देशानुसार ज्या मतदान यंत्राची पडताळणी करायची आहे. त्या यंत्राची निवड करण्याचा अधिकार संबंधित अर्जदार उमेदवाराला आहे. दरम्यान पराभूत उमेदवारांना एकूण मतदान केंद्रांच्या पाच टक्के मतदान केंद्रांवरील ईव्हीएम पडताळणी करता येते.

एका केंद्रावरील ईव्हीएम पडताळणीसाठी 47 हजार 200 रुपये शुल्क लागतं. तसेच ज्या मतदान केंद्रावर आणि मतदान यंत्राची निवड उमेदवाराने केली आहे त्या यंत्रामधील संपूर्ण मतांचा डेटा हा नष्ट केला जातो. त्यानंतर त्याच मतदान यंत्रावर चिन्हाचे बटण एकूण 1200 वेळा दाबून त्या बटणांचे एकूण मतदान मोजले जात असते. प्रत्येक यंत्रासाठी फेर पडताळणी करताना ही प्रक्रिया अवलंबली जाणार आहे.

 

follow us