Ajit Pawar News : दारुण झालेला पराभव EVM च्या माथी मारण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याची जहरी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलीयं. विधानसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीच्या नेत्यांना म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हिएम मशीनवर शंका उपस्थित केली जात आहे. त्यावर बोलताना अजित पवारांनी विरोधकांना चांगलच धारेवर धरलंय.
विधानसभेचा निकाल मान्य नाही, ईव्हीएममुळेच महायुती जिंकली…; मनसे नेत्याचा गंभीर आरोप
अजित पवार म्हणाले, निवडणुकीत ज्यांचा पराभव होतो तेव्हा पराभव ईव्हिएमच्या माथी मारला जातो. यश आलं की चांगलं पण सर्वोच्च न्यायालायने सांगितलंय याबाबत. लोकसभेत आम्हाल यश मिळालं नाही, तेव्हा आम्ही ईव्हिएमला दोष दिला नाही. ईव्हिएम आज नाही तर वर्षानूवर्षे सुरु आहे, आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी नेते काहीतरी करतात हे दाखवण्याचा प्रयत्न. देशातील पश्चिम बंगाल, पंजाब, दिल्ली, कर्नाटक, केरळ, तेलंगणात ईव्हिएम चांगलं, पण निकाल विरोधात गेला की ईव्हिएमचा दोष असं अजितदादांनी स्पष्ट केलंय.
Horoscope Today : आजचे राशी भविष्य जाणून घ्या, या लोकांसाठी आजचा दिवस असेल मजेशीर
तसेच अमेरिकेत ईव्हीएम मशीन वापरले जात नाही, बॅलेट पेपर वापरला जातो पण ट्रम्प मागे निवडणुकीत पडले होते, आता ते निवडून आले आहेत. कोणीही काहीही आंदोलन केलं तरीही आमचा निवडणूक आयोगावर विश्वास असून सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिलायं. ईव्हीएम बरोबर असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय. विरोधकांचा दारुण पराभव झालायं, असं असताना कसं सांगायचं की दारुण पराभव झालायं त्यामुळे पराभव कोणाच्या तरी माथी मारायचं असं विरोधकांचं काम असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.
दिल्लीतून मुख्यमंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब! अमित शाह घोषणा करणार, एकनाथ शिंदे नाराज?
उद्या दिल्लीत वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक :
निवडणुकीचा निकाल हाती आलेला असतानाही अद्याप राज्याचा मुख्यमंत्री ठरला नाही. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, उद्या तिन्ही नेते दिल्लीत जाणार आहेत. याबैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. दिल्लीत उद्या केंद्रीय मंत्री अमित शाहांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बैठक होणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय. पुढील 30 किंवा 1 तारखेपर्यंत राज्याचा मुख्यमंत्री ठरणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगून टाकलंय.