Download App

Video : दप्तर झाले हलके, चार विषयांसाठी एकच पुस्तक

  • Written By: Last Updated:

New Education Policy : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्ताराचे वजन आता हलके झाले आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या पुस्तकांची रचना बदलली आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने नवीन पुस्तकांची निर्मिती केली आहे. यामध्ये प्रत्येक इयत्तानिहाय सर्व विषयांचे चार भाग करण्यात आले असून तीन ते चार विषयांसाठी एकच पुस्तक राहणार आहे, अशी माहिती बालभारतीचे संचालक कृष्ण कुमार पाटील यांनी दिली आहे.

कृष्ण कुमार पाटील म्हणाले की येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या पुस्तकांची रचना बदलली आहे. सर्व विषयांचे चार भाग करण्यात आले आहेत. तीन ते चार विषयांसाठी एकच पुस्तक राहणार आहे. तसेच प्रत्येक पुस्तकांमध्ये एक धडा संपल्यानंतर वहीचे एक पान जोडण्यात आले आहे. त्या पानाच्या वर माझी नोंद, असे लिहिण्यात आले आहे. त्यावर बालभारतीचा लोगोही छापण्यात आला आहे.

बालभारतीच्या नवीन पुस्तकांचे पहिल्या टप्प्यातील छपाईचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्याचे शाळांना वाटप सुरू केले जाणार आहे, असे कृष्ण कुमार पाटील यांनी सांगितले. सध्या ही पुस्तके बालभारतीच्या गोडाऊनमध्ये आहेत. त्याचे वाटप जिल्हा, तालुका व शाळा अशा टप्प्यांमध्ये होणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके मिळणार असल्याचा दावा शिक्षण विभागाकडून केला जात आहे.

HSC Result 2023 : कोकण विभागचं पुन्हा ‘किंग’; बारावीच्या निकालावर मुलींचाच दबदबा

विद्यार्थ्यांसाठी जुनी पुस्तकेही बाजारात उपलब्ध असतील. पाठ्यपुस्तकांच्या नव्या रचनेनुसार तीन-चार विषयांची पुस्तके चार भागांत एकत्रित केले आहेत. पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी कमीत-कमी वह्या आणाव्यात यासाठी प्रत्येक धडा संपल्यानंतर वहीचे एक पान जोडण्यात आले आहे. या पानावर दोन्ही बाजूला धड्याशी संबंधित नोंदी करता येऊ शकतात. प्रत्येक धडा संपल्यानंतर वहीचे एक पान जोडले आहे.

वर्गामध्ये शिक्षकांकडून धडा शिकविला जात असताना विद्यार्थ्यांनी त्यासंदर्भातील नोंदी वहीच्या पानावर करणे अपेक्षित आहे. काही अवघड शब्द, संकल्पना, आकृत्या, काही महत्वाच्या पुस्तकाबाहेरील नोंदी करता येऊ शकतात. वर्गामध्ये वह्या आणाव्याच लागणार आहेत. गृहपाठ किंवा वर्गपाठासाठी स्वतंत्र वह्या करण्याचा पर्याय शिक्षण विभागाने दिला आहे. त्यामुळे वहीचे पान पुस्तकामध्ये जोडले गेले असले तरी संबंधित विषयांच्या वह्या वर्गात आणाव्या लागणार आहेत. त्यामुळे ओझे कमी करण्यासाठी वहीच्या पानाचा उपयोग होणार नाही. पण प्रत्येक विषयानुसार पुस्तकांचे चार भाग करण्यात आल्याने पुस्तकांचे ओझे कमी होणार आहे.

Tags

follow us