Pune yervada Case filed against four people for entering a house and beating a woman and child with a sword : गेल्या काही दिवसांपासून पुणे या विद्येचे माहेरघर मानले जाणाऱ्या शहरामध्ये गुन्हेगारी आणि दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याता आता पुण्यातील येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर येथे रविवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. चार जणांनी घरात शिरून एका महिलेस आणि तिच्या मुलावर तलवारीने हल्ला केला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये मोठी दुर्घटना! भूस्खलनाने धावत्या बसवर दरड कोसळल्याने 18 ठार, अनेक जखमी
फिर्यादी रहीसा महंमद शेख (वय 44, रा. कामराजनगर, येरवडा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जहूर शेख (28), सुलतान खान (20), आझाद खान (22) आणि मुस्तफा खान (21) हे सर्व एकाच परिसरातील रहिवासी असून, अचानक त्यांच्या घरात घुसले.
दगडूशेठ गणपती अन् लालबागच्या राजाकडून पूरग्रस्तांना मदत, निधी सरकारकडे सुपूर्द!
“माझ्या आईला का मारले?” असा प्रश्न विचारत जहूर शेख याने हातातील तलवारीने फिर्यादी महिला आणि तिच्या मुलगा साजिदवर वार केले. यात दोघे गंभीर जखमी झाले. दरम्यान इतर आरोपींनी घरातील वस्तूंचे नुकसान केले तसेच शिवीगाळ करत दहशत निर्माण केली.
केवळ एक बदल करत प्रभाग रचना आरक्षणात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार!
या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, नागरिकांनी पोलिसांकडून तत्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे.