दगडूशेठ गणपती अन् लालबागच्या राजाकडून पूरग्रस्तांना मदत, निधी सरकारकडे सुपूर्द!

flood victims श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून पूरग्रस्तांना मदत देण्यात आली आहे.

Untitle (17)

Untitle (17)

Dagdusheth Halwai Public Ganapati Trust and Lalbaugcha Raja Public Ganeshotsav Mandal provide assistance to flood victims : राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागात नदी नाल्यांना पूर आला आहे. (Monsoon) त्यामुळं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला जात आहे. त्यात आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून पूरग्रस्तांना मदत देण्यात आली आहे.

केवळ एक बदल करत प्रभाग रचना आरक्षणात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार!

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मराठवाड्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 50 लाखाचा चेक राज्य सरकारकडे सुपूर्द. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला चेक.यावेळी लालबागचा राजा मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आणि पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; सात जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या, कुंभमेळ्यासाठी नाशिकला खास आयुक्त

अतिवृष्टीच्या संकटामुळे आपल्या राज्यातील शेतकऱ्यांवर आसमानी संकट आले आहे. जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या माध्यमातून एक कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी संवेदनशील मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आली. तसेच ट्रस्टच्या माध्यमातून संचलित सुवर्णयुग सहकारी बँकेकडूनही 25 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.

फिनटेक कंपन्यांना वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले चार मंत्र! व्यवसाय झपाट्याने वाढवण्यासाठी फॉर्म्युला

यावेळी ट्रस्टचे सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने, अध्यक्ष सुनीलभाऊ रासने, कोषाध्यक्ष महेशजी सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सहकार्याध्यक्ष सचिनजी आखाडे, संघटक सूर्यवंशी यांच्यासह तुषार रायकर, अंकुश रासने, प्रतीक घोडके, सुवर्णयुग सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश परदेशी आदी उपस्थित होते.

Exit mobile version