Download App

पुण्याच्या खाद्यसंस्कृतीची जगभर वाहवा! टॉप 150 मिठाईच्या दुकानांमध्ये कयानी बेकरी, चितळे बंधूंचा समावेश

  • Written By: Last Updated:

Kayani Bakery : पुणे तिथं काय उणे असं म्हटल्या जातं. विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेले पुणे खाद्यसंस्कृतीमुळेही नावाजले आहे. आता पुण्याचा जगभरात डंका झाला आहे. एका आंतरराष्ट्रीय एजन्सीने पुण्याच्या खाद्यसंस्कृतीची वाहवा केली आहे. पुणे कॅम्पची कयानी बेकरी (Kayani Bakery) आणि चितळे बंधू (Chitale brothers) मिठाईवाले यांचा जगातील टॉप 150 मिठाईच्या दुकानांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. टेस्ट अॅटलस (Test Atlas) या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन फूड गाइडने ही क्रमवारी जाहीर केली आहे. त्यामुळं पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

https://www.youtube.com/watch?v=oTEzlFgbZb0

लिस्बनच्या रुआ डी बेलेमने या यादीत पहिले स्थान पटकावले आहे आणि पास्ता डी बेलेम ही त्यांची प्रसिद्ध मिठाई आहे. या यादीत भारतातील 10 दुकाने असून पुण्यातील कयानी बेकरी आणि चितळे बंधू मिठाईवाले यांचा त्यात समावेश आहे. पुण्यातील ईस्ट स्ट्रीटवर कयानी बेकरी असून त्यांचा मावा केक प्रसिद्ध आहे. खोदयार, होरमझदियार आणि रुस्तम या तीन कयानी बंधूंनी १९५५ मध्ये बेकरी सुरू केली. कयानी बंधू मूळचे इराणचे होते. पुण्यात येण्यापूर्वी त्यांनी अगदी सुरुवातीला मुंबईत बेकरी सुरू केली होती. त्यानंतर आता कयानी ब्रदर्सच्या पुढच्या पिढ्या हा व्यवसाय पाहत आहेत.

मनोज जरांगेंना रुग्णालयातून डिस्चार्ज; आता साखळी उपोषण करून थोपटणार सरकार विरोधात दंड 

चितळे बंधू मिठाईवाले 1950 मध्ये रघुनाथ चितळे आणि नरसिंह चितळे यांनी सुरू केले. त्यांनी बाजीराव रोडवर पहिले दुकान सुरू केले. आता त्यांची तिसरी पिढी व्यवसाय सांभाळत आहे. त्यांची उत्पादने संपूर्ण भारतात आणि परदेशातही उपलब्ध आहेत. चितळे बंधू मिठाईवाले हे बाकरवडी आणि विविध मिठाईसाठी ओळखले जाते.

भारतातील आघाडीची मिठाईची दुकाने

मावा केक: कयानी बेकरी (पुणे)

रसगुल्ला: केसी दास (कोलकाता)

रम बॉल्स: फ्ल्युरी (कोलकाता)

फ्रूट बिस्किट: कराची बेकरी (हैदराबाद)

संदेश: बलराम मलिक आणि राधारमण मलिक (कोलकाता)

आईस्क्रीम सँडविच: के रुस्तम आणि कंपनी (मुंबई)

कुल्फी: कुरेमल कुल्फी (दिल्ली)

कुल्फी फालुदा: प्रकाश कुल्फी (लखनौ)

बाकरवाडी : चितळे बंधू (पुणे)

जलेबी: जलेबी वाला (दिल्ली)

 

Tags

follow us