पुणे-मिरज रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचे किती काम झाले? पूर्ण कधी होणार? मध्य रेल्वेने दिली सविस्तर अपडेट

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात व्यस्त रेल्वेमार्गापैकी असलेल्या पुणे-मिरज दुहेरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे ते मिरज हा 6 तासांचा प्रवास 4 तासांवर येणार आहे. शिवाय सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा, या भागातील आणि दक्षिणेत जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे. पण या प्रवासाला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. (Pune-Miraj railway doubling […]

Indian Railways

Indian Railways

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात व्यस्त रेल्वेमार्गापैकी असलेल्या पुणे-मिरज दुहेरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे ते मिरज हा 6 तासांचा प्रवास 4 तासांवर येणार आहे. शिवाय सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा, या भागातील आणि दक्षिणेत जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे. पण या प्रवासाला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. (Pune-Miraj railway doubling work Detailed update given by Central Railway)

पुणे – मिरज रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचे किती काम झाले?

पुणे-मिरज विभागाचे दुहेरीकरण

➡️एकूण लांबी- 279.05 किमी
➡️पूर्ण दुहेरीकरण- 167.14 किमी (60%)
➡️एकूण किंमत- 4882.53 कोटी
➡️आजपर्यंतचा खर्च- 3122.51 कोटी (64%)
➡️एकूण भौतिक प्रगती- 84%
➡️जमीन संपादन पूर्ण- 97.04 हेक्टर/115 हेक्टर (84.38%).

पूर्ण झालेले विभाग :

पुणे-मिरज रेल्वेमार्गावरील 167.14 किलोमीटरचे म्हणजे 60% टक्के काम पूर्ण झाले आहे. यात पुणे ते शिंदवणे, आंबले ते निरा, आदर्की ते लोणंद, पळशी ते जरंडेश्वर, सातारा ते कोरेगाव आणि सांगली ते शेणोली या दरम्यानचे काम पूर्ण झाले आहे.

पूर्णत्वास आलेले काम :

81.34 किलोमीटरचे काम म्हणजे 29.14 % काम पूर्णत्वास आले आहे. यात लोणंद ते निरा, पळशी ते आदर्की, सातारा- ते जरंडेश्वर, शेणोली ते तारगाव आणि सांगली ते मिरज या मार्गावरील काम पूर्णत्वास आले आहे. हे काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

प्रगतीपथावर असलेले काम :

तर 30.5 किलोमीटर म्हणजे 10.86% काम हे अद्याप प्रगतीपथावर असून ते जून 2024 पर्यंत होण्याची शक्यता आहे. अंबाले ते शिंदवणे आणि तारगाव ते कोरेगाव या टप्प्यावरचे काम अद्याप सुरु आहे. या मार्गावर अनेक अवघड वाटा आहेत. हा भाग डोंगराळ असून बोगदे अन् पुलांची उभारणी करावी लागत आहे. त्यामुळे या कामांना विलंब होत आहे.

पूर्ण झालेली कामे :

Exit mobile version