Surekha Jadhavar Awarded By Navadurga Adarsh Mata Award : पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या खजिनदार सुरेखा जाधवर यांना नवदुर्गा आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आला. आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सुरेखा जाधवर यांना गौरविण्यात आले.
आदर्श माता पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन
डॉ. ज्ञानोबा मुंडे यांच्या संकल्पनेतून प्रकृती केअर फाउंडेशनच्या वतीने आदर्श (Navadurga Adarsh Mata Award) नवदुर्गा, आदर्श माता पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन सुखसागर नगर येथील ई लर्निंग स्कूल मैदानात करण्यात (Pune News) आले होते. यावेळी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसचे उपाध्यक्ष ऍड. शार्दुल जाधवर उपस्थित होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांना यावेळी गौरविण्यात (Surekha Jadhavar) आले.
शिक्षणाची दारे उघडी केली
योगेश टिळेकर म्हणाले, शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे उघडी करणाऱ्या प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर यांच्या मागे सुरेखा जाधवर या भक्कमपणे उभ्या राहिल्या. त्यांच्या योगदानामुळे संस्था आज एका महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे.
सुरेखा जाधवर म्हणाल्या, गोरगरीब, वंचित मुलांसाठी प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर यांनी जाधवर शैक्षणिक संस्था पुण्यामध्ये स्थापन केली. त्यांना साथ देताना गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता आले याचा आनंद होतो.