Kondhwa Search Operation : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील कोंढवा परिसरात पुणे पोलीस आणि एटीएसकडून मोठी छापेमारी करण्यात येत आहे. ही छापेमारी मध्यरात्रीपासून सुरु असून आतापर्यंत काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
कोंढवा (Kondhwa) येथे सुरु असणाऱ्या छापेमारीमुळे केवळ पुण्यातच नाहीतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या परिसरातून दोन वर्षांपूर्वी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेच्या तीन सदस्यांना अटक केली होती. तर पुन्हा एकदा एटीएस (ATS) आणि पुणे पोलिसांकडून (Pune Police) कोंढवा येते छापेमारी (Kondhwa Search Operation) सुरु असल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
कोल्ड्रिफ कफ सिरपवर मोठी कारवाई, कंपनी मालक रंगनाथनला अटक
Maharashtra | Multiple enforcement agencies, including Pune Police, are conducting searches in Pune’s Kondhwa area to trace suspects allegedly involved in anti-national activities: Pune City Police
— ANI (@ANI) October 9, 2025
दोन वर्षांपूर्वी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत कोंढवा येथून बंदी असणाऱ्या दहशतवादी संघटनेच्या तीन सदस्यांना अटक केली होती. यानंतर देशातील संभाव्य दहशतवादी कट उधळण्यात यश आलं होतं. तर दुसरीकडे सध्या सुरु असणाऱ्या छापेमारीबाबत शोधमोहीम पूर्ण झाल्यानंतर माहिती देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Asaduddin Owaisi : नगर शहरात आज खासदार ओवैसींची जाहीर सभा, टार्गेट कोण?