Pune Diwali Firecracker Rules : दिवाळीचा सण आनंदाचा असतो, मात्र गेल्या काही वर्षांत मोठमोठ्या आवाजाचे फटाके फोडल्यामुळे नागरिकांमध्ये त्रास वाढला आहे. यामुळे पुणे पोलीस आयुक्तालयाने फटाके विक्री आणि फोडण्यासंबंधी कठोर नियमावली जाहीर केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
नियमांचा मुख्य उद्देश ध्वनी (Pune News) आणि वायू प्रदूषण टाळणे आहे, ज्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या निर्बंधांची अंमलबजावणी केली जात आहे.
पुणेकरांसाठी फटाके वाजवण्याचे नियम
– रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत फटाके वाजवण्यास (Diwali) पूर्णपणे बंदी आहे.
– आवाज न करता फक्त रंग निर्माण करणारे फटाके (फुलबाजी, अनार) या वेळेनंतर वाजवण्यास परवानगी आहे.
– अॅटमबॉम्ब नावाच्या उच्च ध्वनी निर्माण करणाऱ्या (Firecracker Rules) फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि जवळ ठेवणे पूर्णपणे बंदी आहे.
– 100 पेक्षा जास्त फटाके असलेल्या साखळी फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि वापर देखील मनाई आहे.
– फटाके उडवण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरावर 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांवर बंदी आहे; साखळी फटाक्यांसाठी ही मर्यादा 105–115 डेसिबल आहे.
– रुग्णालये, शाळा, महाविद्यालये आणि न्यायालयांच्या परिसरात 100 मीटर अंतरापर्यंत कोणत्याही प्रकारच्या फटाक्यांवर मनाई आहे. हे परिसर आता सायलेंट झोन म्हणून घोषित आहेत.
– रस्ते, पूल, घाट किंवा सेतूजवळ फटाके उडवण्यास मनाई आहे.
फटाके विक्रेत्यांसाठी नियम
1. पुणे शहरात फटाके विक्रीसाठी 20 ते 24 ऑक्टोबर दरम्यान तात्पुरते परवाने वैध असतील.
2. रस्त्यापासून 10 मीटर अंतरापर्यंत फटाके फोडणे, फेकणे किंवा अग्निबाण उडवणे मनाई आहे.
3. विक्रेत्यांनी ध्वनी मर्यादेचे पालन करणे अनिवार्य आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे की, नागरिकांनी या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच पर्यावरण संरक्षण कायदा अंतर्गत कायदेशीर कारवाई होईल.