National Sports Day : चंद्राच्या साक्षीने ध्यानसिंगचे झाले ध्यानचंद; खास आहे नावाचा किस्सा

National Sports Day : मेजर ध्यानचंद यांनी हॉकीत क्रिकेटप्रमाणे डॉन ब्रॅडमन आणि फुटबॉलमध्ये पेले यांच्यासारखाच दर्जा प्राप्त केला आहे. 29 ऑगस्ट 1905 रोजी अलाहाबाद येथे जन्मलेल्या ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त देशात दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. भारताच्या या महान खेळाडूचं नाव त्यांच्या मित्रांमुळे बदलले होते. मेजर ध्यानचंद यांच्या खेळाने विरोधी संघ […]

Letsupp Image   2023 08 29T113726.126

Letsupp Image 2023 08 29T113726.126

National Sports Day : मेजर ध्यानचंद यांनी हॉकीत क्रिकेटप्रमाणे डॉन ब्रॅडमन आणि फुटबॉलमध्ये पेले यांच्यासारखाच दर्जा प्राप्त केला आहे. 29 ऑगस्ट 1905 रोजी अलाहाबाद येथे जन्मलेल्या ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त देशात दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. भारताच्या या महान खेळाडूचं नाव त्यांच्या मित्रांमुळे बदलले होते. मेजर ध्यानचंद यांच्या खेळाने विरोधी संघ अक्षरक्षः घाबरून जात असे. एकदा नेदरलँडमध्ये एका स्पर्धेदरम्यान, त्यांच्या स्टीकमध्ये चुंबक आहे की नाही हे तपासण्यासाठी त्यांची हॉकी स्टिक तोडण्यात आली होती. असेच काही खास किस्से खास तुमच्यासाठी.

पुण्यातील दोन ‘दादांचा’ वाद शिगेला; नाराजी नाट्यात CM शिंदेंची एन्ट्री

मित्रांमुळे बदलेले नाव

भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांनी तीन ऑलिम्पिक खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या उपस्थितीत संघाने प्रत्येक वेळी सुवर्णपदक जिंकले. 1928, 1932 आणि 1936 च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी आश्चर्यकारक कामगिरी केली.

ध्यानचंद वयाच्या १६ व्या वर्षी भारतीय सैन्यात दाखल झाले होते. सैन्यात दाखल झाल्यानंतर ते हॉकी खेळू लागले. ध्यानचंद चंद्राच्याप्रकाशात सराव करत असे. त्यामुळे त्यांच्या सहकारी खेळाडू त्यांच्या नावासमोर ध्यानचंद असे म्हणू लागले. ध्यानचंद यांचे खरे नाव ध्यानसिंग असे होते. मात्र, चंद्राच्या प्रकाशात होणाऱ्या सरावामुळे त्यांना त्यांचे सहकारी खेळाडू ध्यानचंद असे लावण्यास सुरूवात केली.

अहमदाबादमध्ये रंगणार विश्वचषकाचा शानदार उद्घाटन सोहळा; 10 संघाच्या कर्णधारांची हजेरी

हिटलरची ऑफर नाकारली

असे म्हणतात की ऑलिम्पिक जिंकल्यानंतर हिटलरने ध्यानचंद यांना जेवायला बोलावले आणि विचारले की तुम्ही खेळण्याशिवाय दुसरे काय काम करता. यावर मेजर ध्यानचंद म्हणाले की, मी भारतीय लष्कराचा सैनिक आहे. यानंतर हिटलरने त्यांना जर्मन सैन्यात उच्च पदावर भरती होण्याची ऑफर दिली, परंतु मेजर ध्यानचंद यांनी त्यांचा प्रस्ताव नाकारला. मी भारतीय सैनिक असून भारताला पुढे नेणे हे माझे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले होते.

अॅमस्टरडॅम येथे 1928 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत ध्यानचंद यांनी भारतासाठी सर्वाधिक 14 गोल केले होते. त्यावेळी तेथील एका स्थानिक वृत्तपत्राने ‘ही हॉकी नसून जादू होती आणि ध्यानचंद हे हॉकीचे जादूगार आहेत.’ असे म्हणत त्यांचा गौरव केला होता.

Exit mobile version