Download App

बिहारमध्ये NDA ला धक्का; चिराग पासवान सोडणार साथ?

Chirag Paswan : बिहार विधानसभा निवडणुकांपूर्वी (Bihar Assembly Elections) चिराग पासवान (Chirag Paswan) देशाच्या राजकारणात चर्चेत आहे.

  • Written By: Last Updated:

Chirag Paswan : बिहार विधानसभा निवडणुकांपूर्वी (Bihar Assembly Elections) चिराग पासवान (Chirag Paswan) देशाच्या राजकारणात चर्चेत आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी एनडीएपासून (NDA) वेगळे होण्याचे संकेत दिले होते मात्र आता त्यांनी यावर स्पष्टीकरण देत ते एनडीएचा भाग असल्याचे म्हटले आहे. यावेळी चिराग पासवान म्हणाले की, मी बिहार सरकारचा भाग नाही पण मी त्यांना पाठिंबा देत आहे. असं चिराग पासवान म्हणाले. तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे खासदार अरुण भारती यांनीही चिराग पासवान एनडीएपासून वेगळे झाल्याचे नाकारले आहे.

एनडीएपासून वेगळे होण्याची चर्चा

चिराग पासवान यांनी स्पष्ट केले आहे की ते एनडीएमध्ये आहेत आणि त्यांचे विधान चुकीचे सादर केले गेले आहे. चिराग पासवान यांनी एका टीव्ही चॅनेलला मुलाखत दिली. यानंतर येथून एक बातमी प्रसिद्ध झाली की चिराग पासवान यांनी आता एनडीएचा भाग नसल्याचे म्हटले आहे. अशा बातम्या अनेक साईट्सवर सुरू झाल्या. यानंतर चिराग पासवान यांना स्पष्टीकरण द्यावे लागले.

येवल्यात शेतकरीच स्वातंत्र्यदिनी करणार कर्जमुक्तीची घोषणा; भागवतराव सोनवणे 

चिराग पासवान यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की त्यांनी कोणत्या जागेवर आणि किती जागांवर निवडणूक लढवायची हे ठरवले आहे. त्यांनी त्यांचा गृहपाठ पूर्ण केला आहे. त्यांनी स्वतः निवडणूक लढवण्याबाबत असेही म्हटले की त्यांना बिहारमधून निवडणूक लढवायची आहे, परंतु पक्ष पातळीवर यावर चर्चा सुरू आहे.

follow us