Download App

सामान्यांनाही एका दिवसात वजन वाढवण किंवा कमी करणं शक्य आहे? काय सांगत मेडिकल सायन्स

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील 7 ऑगस्टचा दिवस सर्वांच्या कायम लक्षात राहिल. कारण याच दिवशी कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस अपात्र ठरवली गेली.

  • Written By: Last Updated:

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील 7 ऑगस्टचा दिवस सर्वांच्या कायम लक्षात राहिल. कारण याच दिवशी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यापूर्वी काही ग्रॅम वजन वाढल्याने अपात्र ठरवली गेली. हा भारतासह सर्वांसाठीच मोठा धक्का होता. मात्र, या घटनेनंतर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न उपस्थित होत आहे की, एका दिवसात अचानक 2 किलो वजन कसे वाढू शकते. हे कसे घडले आणि सामान्य माणसाला एका दिवसात वजन वाढवणे किंवा कमी करणे शक्य आहे. या सर्वामध्ये मेडिकल सायन्स (Medical Science) नेमकं काय सांगत जाणून घेऊया. (How Much Weight Can Be Gained Or Loss In One Day? )

‘सगळं संपलं, आता आणखी ताकद नाही’ : विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदा…

ॲथलीट वजन कसे वाढवतात?

कोणत्याही मैदानात खेळताना प्रत्येक खेळाडूला भरपूर ऊर्जा लागते. त्यामुळे खेळाडूंना सामान्य व्यक्तीच्या तुलनेत वेगळ्या प्रकारचा आहार (Diet) दिला जातो. त्यानुसार त्यांचा डाएट प्लॅन तयार केला जातो. यात प्राधान्याने प्रथिने, जीवनसत्त्वे, फॅट आणि कर्बोदके असे सर्व त्यांच्या आहारात विहित मानकांनुसार दिली जातात. सामान्य व्यक्ती आणि ॲथलीटचे या दोघांचेही वजन अचानक वाढू शकते. परंतु जर आपण सामान्य व्यक्तीबद्दल बोललो तर तो असा आहार घेत नाही ज्यामुळे त्याचे वजन वेगाने वाढेल.

Vinesh Phogat: नखं कापली केस कापली अन् रक्तसुद्धा काढलं; मात्र, वजन प्रकारात विनेशची हार

एका दिवसात 2 किलो वजन कसे वाढते?

अशी अनेक कारणे आहेत. ज्यामुळे एका दिवसात सुमारे दोन किलो वजन वाढू शकते. असे अचानक वजन वाढणे हे ऍथलीट्समध्ये घडू शकते तर, काही प्रकरणांमध्ये सामान्य व्यक्तीबाबतही हे घडू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे. यामागे अनेक कारणे आहेत. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने क्रॅश डाएट घेतला तर त्याचे वजन एका दिवसात 2 किलोने वाढू शकते. याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला सुरुवातीला कमी कार्बोहायड्रेट दिले गेले आणि अचानक कार्बोहायड्रेटचे प्रमाण वाढले तर एका दिवसात संबंधित व्यक्तीचे वजन 1 ते 2 किलोने वाढते.
शरीरात पाण्यासोबत साठलेल्या कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अचानक वाढणे हे याचे प्रमुख कारण आहे. अनेक दिवसांनी अचानक जास्त कार्बोहायड्रेटयुक्त आहार घेतल्यानेही वजन वाढते.

कापलेले केस, हाताला सलाईन अन् चेहऱ्यावर निराशापूर्ण स्मित; रुग्णालयातून विनेशचा पहिला फोटो समोर….

अतिरिक्त सोडियम

आहारात सोडियमचे प्रमाण जास्त असल्यासही वजन वाढू शकते. जास्त सोडियममुळे शरीरात मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वजन वाढू शकते. याचे कारण असे की, शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी सोडियम आणि पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवणे आवश्यक आहे, जर तुम्ही जेवताना जास्त मीठाचे सेवन केल्यास शरीरातील सोडियम वाढते. त्यामुळे अचानक वजन वाढू शकते. त्यामुळे जेव्हा एखादा खेळाडू एखाद्या स्पर्धेत सहभागी होतो त्यावेळी त्याला त्याचे वजन कमी ठेवण्यासाठी खारट पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो.

हेवी वर्कआउट

जर एखाद्या व्यक्तीने आदल्या दिवशी हेवी वर्कआऊट केला असेल आणि नंतर थोडासा आहार घेतला असल्यासही वजन अचानक वाढू शकते. असे घडण्याचे मुख्य कारण म्हणजे व्यायामानंतर स्नायूंच्या तंतूंवर येणार ताण होय. त्यामुळे अशा स्थितीत काही खाल्ले तरी शरीर फुगू शकते, त्यामुळे वजन वाढते. अशा परिस्थितीत. आदल्या दिवशी हेवी वर्क आऊटनंतर दुसऱ्या दिवशी हाई कॉर्बोहायड्रेट असलेला आहार घेणे टाळावे. असे न केल्यास वजन अचानक एक ते दोन किलोने वाढू शकते.

ऑलिम्पिकसाठी 70 लाखांची मदत; जागतिक दर्जाचे प्रशिक्षक; केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी सगळं सांगितलं

किती वेळात कमी होऊ शकते वजन ?

सामान्य व्यक्तीच्या तुलनेत ॲथलीट वर्कआउट करून वेगाने वजन कमी करू शकतात, पण 2 ते 3 किलो वजन कमी करण्यासाठी किमान 24 तास लागतात. काही प्रकरणांमध्ये लवकरही वजन कमी होऊ शकते. पण असे होणे खूप अवघड आहे. एका दिवसात अचानक दोन ते तीन किलो वजन कमी करणे सोपे नाही. अनेक वेळा प्रयत्न करूनही वजन कमी करण्यासाठी शरिरातील पाणी कमी करता येत नाही. जर शरिरातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली तर, शरीर डिहायड्रेशनला बळी पडू शकते. यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

follow us