Devendra Fadanvis Request for Free from Government : महाराष्ट्रातील अपयशानंतर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी उपुमख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं, अशी विनंती केंद्रीय नेतृत्वाला केली आहे. लोकसभेच्या पराभव नंतर आगामी विधानसभेसाठी मला पक्षात अंतर्गत काम करायचं आहे. त्यासाठी मी पक्षश्रेष्टीकडे मागणी करणार आहे, त्यांची भेट घेणार आहे. विधानसभेच्या दृष्टीने फक्त काम करण्यासाठी मला सरकार मधून मोकळा करा अशी ही मागणी मी पक्षश्रेष्ठींकडे करणार आहे. असं फडणवीस म्हणाले आहेत.
‘सरकारमधून मला मुक्त करावा’ फडणवीसांची पक्षश्रेष्टीकडे मोठी मागणी
दोन महिन्यांपूर्वी मोठ्या उत्साहात बिगूल वाजलेल्या लोकसभा निवडणुकांची सांगता अखेर काल (दि.4) अंतिम निकालाने पूर्ण झाली. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपकडून आम्ही महायुती म्हणून 45 च्या पुढे जागा जिंकू असा नारा दिला होता. तसंच, भाजपकडून दोन पक्ष फोडण्यात आले. एक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. परंतु, सामान्य मतदारांनी हे सगळ नाकारलं हेच या निवडणुकीत समोर आलं आहे. कारण भाजपला दोन आकडी संख्याही गाठता आली नाही इतका दारून पराभव झाला आहे. या अपयशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज ( 5 जूनला) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पराभवाची जबाबदारी घेतली आहे.