Devendra Fadanvis Criticize by Manoj Jarange : देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांना मराठ्यांविषयी जास्तच प्रेम आहे. अशा शब्दांत मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना फडणवीसांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी फडणवीसांना टोला लगावला.
तिकीटाचं नाही नक्की पण, तयारी केली पक्की; राणेंच्या नव्या खेळीने शिंदे गट अस्वस्थ
देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांविषयी जास्तच प्रेम आहे. देवेंद्र फडणवीस हे खूप चांगले गृहमंत्री आहेत. त्यांनी आमचे खूप चांगले केले. अजूनही काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. असं जरांगे म्हणाले. तर लोकसभा निवडणुकीबाबत विचारलं असता जरांगे म्हणाले की, लोकसभेला आमचा कुणालाही पाठिंबा नाही, आणि आमचा उमेदवारही नाही. समाजाने अपक्ष उमेदवारी करण्यापेक्षा पाडण्याचे काम करावे तेव्हा त्यांना मराठ्यांची ताकद समजेल.
सुनेचा हक्क नाकारणारे, बारामतीच्या लेकीचे अगतिक बाबा; बाहेरुन आलेल्या पवार वादात शेलारांची टीका
पाडण्यातही विजय आहे. महाविकास आघाडी असो महायुती असो, चाळीस वर्षे आम्हाला फसवलच. 6 जून पर्यंत काही झालं तर ठीक आहे. नाहीतर विधानसभेला आहेच बघून घेतो. कदाचित 5 जूनला मी पुन्हा उपोषणाला बसणार आहे. आम्ही आमच्या हक्काचे ओबीसी मधून आरक्षण मागतो. आम्हालाच मिळे ना झाले. आता इतर समजाचे पण आम्हीच मागतो. छगन भुजबळ निवडणुकीत उभे राहिल्यास आम्ही त्यावेळी बघू. अशोक चव्हाण सत्तेत असले की वेगळे आणि विरोधात असले की आमच्या बाजूने बोलतात, आता ते सत्तेत आहेत.