Download App

उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार; राज्यातील पराभवाची जबाबदारी फडणवीसांनी घेतली !

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर पक्ष नेतृत्वाकडे मोठी मागणी करत सरकारमधून

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Devendra Fadnavis: आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर पक्ष नेतृत्वाकडे मोठी मागणी करत सरकारमधून मला मुक्त करावा अशी विनंती केली आहे.

पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला पूर्ण बहुमत दिले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होतील. एकट्या भाजपने इंडिया आघाडीपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. मात्र, निवडणुकीतील जनतेचा जनादेश आहे तसा स्वीकारला पाहिजे. आम्ही सखोल आत्मपरीक्षण करू आणि पुढील विधानसभा निवडणुकीत आमचे नुकसान भरून काढू असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तसेच संविधान बदलणार या नेरेटिव्हचा फटका या लोकसभा निवडणुकीत आम्हाला मोठ्या प्रमाणात बसला याची कबुली देखील यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

प्रचारादरम्यान निवडणुका जिंकल्यानंतर भाजप राज्यघटना बदलेल असा खोटा प्रचार विरोधकांनी केला होता आणि या नेरेटिव्हचा फटका आम्हाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. याच बरोबर राज्यात काही भागात मराठा आरक्षणाचा फटका आम्हाला बसला यामुळे राज्यात एनडीएची कामगिरी ढासळली अशी कबुली देत फडणवीसांनी मला सरकार मधून मोकळा करावा अशी मागणी केली.

आम्हाला 2019 मध्ये 27.84 टक्के मत आणि 23 जागा मिळाले होते यावेळी दीड टक्का कमी मतदान मिळाले आणि नऊ जागा मिळाले. आम्हाला लोकांनी नाकारले नाही असं देखील फडणवीस म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज