Download App

Chhattisgarh Election : छत्तीसगडमध्ये मोठा उलटफेर, उपमुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ल्यातच पराभव

Chhattisgarh Assembly Election 2023 : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत (Chhattisgarh Assembly Election) मोठा उलटफेर पाहायला मिळतोय. विद्यमान उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव (TS Sinhadev) यांचा पराभव झाला आहे. ते अंबिकापूर जागेवर काँग्रेसचे उमेदवार होते. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेश अग्रवाल यांनी त्यांचा पराभव केला आहे.

अंबिकापूर ही जागा टीएस सिंहदेव यांचा बालेकिल्ला मानली जात होती, मात्र भाजपने येथे बाजी मारली आहे. टीएस सिंहदेव यांचा पराभव हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे.

तेलंगणाच्या विजयाचा जादूगार ‘रेवंत रेड्डी’; मुलीच्या लग्नासाठी मिळला होता फक्त 12 तासांचा जामीन

या निवडणुकीत पराभूत झालेले टीएस सिंहदेव हे काँग्रेसचे एकमेव मोठे नेते नाहीत, तर प्रदेशाध्यक्ष दीपक बैज हे चित्रकोटमधून तर मंत्री अमरजीत भगत हे सीतापूरमधून पराभूत झाले आहेत. या दोघांचाही भाजपच्या उमेदवारांनी पराभव केला आहे.

2008 पासून अंबिकापूर काँग्रेसचा बालेकिल्ला
टीएस सिंहदेव यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे मानले जात होते. टीएस सिंहदेव हे छत्तीसगडमध्ये ‘बाबा’ म्हणून प्रसिद्ध आहेत. अंबिकापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. 2003 च्या विधानसभा निवडणुका वगळता ही जागा नेहमीच काँग्रेसच्या ताब्यात राहिली आहे.

Rajasthan Election : राजकुमारीची जादू कायम! दणदणीत विजयासह आता CM पदासाठी शर्यतीत

2003 मध्ये भाजपचे कमल भान सिंह यांनी अंबिकापूरच्या जागेवर कमळ फुलवले होते. 2008 मध्ये अंबिकापूर जागा ही सर्वसाधारण बनली. टीएस सिंहदेव 2008, 2013 आणि 2018 मध्ये सलग तीन वेळा या जागेवर विजयी झाले होते, परंतु यावेळी परिस्थिती उलटी झाली आहे.

उमेदवारी अर्ज भरताना टीएस सिंहदेव यांचा आर्शिवाद घेतला
राजेश अग्रवाल यांनी 2018 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. राजेश अग्रवाल हे टीएस सिंहदेव यांच्या जवळचे मानले जातात. त्याचवेळी उमेदवारी अर्ज भरताना दोघांची भेट झाली होती. त्यावेळी राजेश अग्रवाल यांनीही त्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले होते. त्या दिवशी दोघेही खूप जवळून भेटले होते. राजेश अग्रवाल हे लखनपूर नगरपंचायतीचे अध्यक्ष आहेत.

Tags

follow us

वेब स्टोरीज