Telangana election 2023 : पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकापैकी (Telangana election 2023) राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे. मात्र दक्षिणेतून काँग्रेसला दिलासा मिळाला. बीआरएसला (BRS) धुळ चारत काँग्रेसने तेलंगणात सत्ता मिळवली आहे. काँग्रेसच्या या विजयाचे शिल्पकार रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांना मानलं जातंय. पण एकेकाळी मुख्यमंत्री केसीआर (KCR) यांनी रेवंत रेड्डी यांना जेलमध्ये टाकलं होतं. त्यावेळी मुलीच्या लग्नासाठी त्यांना फक्त 12 तासांचा जामीन मंजूर करण्यात आला होता.
त्यांची मुलगी निमिषा रेड्डी यांचा विवाह भीमावरम येथील जी वेंकट रेड्डी यांचा मुलगा सत्यनारायण रेड्डी यांच्याशी झाला आहे. ते जे रेड्डी आणि रेड्डी मोटर्सचे मालक आहेत. या विवाह सोहळ्याला तत्कालीन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, मंत्री आणि तेलुगु देसमचे नेते उपस्थित राहिले होते.
रेवंत रेड्डी यांना जेलमध्ये का टाकलं?
कॅश फॉर व्होट प्रकरणात रेवंत रेड्डी यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी ते तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) आमदार होते. जून 2015 मध्ये त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी 12 तासांच्या जामीनावर सुटका करण्यात आली होती.
Chhattisgarh Election 2023 : छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसच्या ‘या’ चुका ठरल्या भाजपच्या विजयाची कारणं…
आमदार एल्विस स्टीफन्सन यांना 50 लाख रुपयांची लाच देताना रेवंत रेड्डी यांना 31 मे 2015 रोजी एसीबीच्या पथकाने अटक केली होती. रेड्डी यांनी विधानसभा परिषद निवडणुकीत टीडीपी-भाजप उमेदवाराच्या बाजूने मतदान करण्यासाठी ही ऑफर दिली होती. स्टीफनसनच्या तक्रारीवर कारवाई करत एसीबीने रेड्डी यांना त्याच्या दोन साथीदारांसह अटक केली होती.
तेलंगणात ओवेसींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त, मुस्लीम व्होटबँक कोणाच्या पारड्यात?
काँग्रेसमध्ये प्रवेश
जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी 2017 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण 2018 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर, काँग्रेसने त्यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मलकाजगिरी येथून तिकीट दिले होते. यामध्ये ते 10,919 मतांनी विजयी झाले. 2021 मध्ये काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करून त्यांना मोठी जबाबदारी दिली.
2013 मध्ये तेलंगणाची स्थापना झाल्यापासून राज्यात केसीआर व्यतिरिक्त कोणताही मुख्यमंत्री झालेला नाही. तेलंगणामध्ये काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून रेवंत रेड्डी यांच्याकडे पाहिलं जात आहे.