Balasaheb Thorat : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभव झाला आहे. महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांच्या पराभव केला आहे.
अमोल खताळ सायबर कॅफे चालवत होते. त्यांनी काही वेळ राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षात देखील काम केले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना विखे समर्थक मानले जातात आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना शिंदे गटाकडून ऐनवेळी तिकीट मिळाले होती. महायुतीकडून या जागेसाठी माजी खासदार सुजय विखे इच्छुक होते.
तर दुसरीकडे अजित पवार यांनी देखील बारामती विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचा पराभव केला आहे. याच बरोबर कसाब विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने 19,320 मतांनी विजयी झाले आहेत.
महाविकास आघाडीला या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठे धक्का बसले आहे. नगर जिल्ह्यात तिन्ही माजी मंत्र्यांचा पराभव झाला आहे. नेवासा मतदारसंघातून गडाख, राहुरी विधानसभा मतदारसंघातून तनपुरे आणि संगमेनर विधानसभा मतदारसंघातून थोरात यांचा पराभव झाला आहे. तर कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला आहे.