Chhagan Bhujbal : राज्यात महायुतीला (Mahayuti) अभूतपूर्व यश मिळाले आहे. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीला 239 जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi केवळ 49 जागांवर यश मिळालं. त्यामुळं आता राज्यात महायुतीचीच सत्ता येणार, हे स्पष्ट झालं. मात्र, मुख्यमंत्री कोण होईल, हे अद्याप स्पष्ट झालं नाही. दरम्यान, मुख्यमंत्रीपदावर आता छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) भाष्य केलं.
राज्यात महायुतीची लाट; शरद पवार, संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदीसाठी राज्यसभेचे दार बंद?
छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. दरम्यान, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे का? असे भुजबळांना विचारले असता ते म्हणाले की, आम्ही आमचे नेते अजित पवारांची नेतेपदी एकमताने नेमणूक केली आहे. शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे आहेत. भाजपच्या नेतेपदी कोण ते कळायचं आहे. आमचा काही फडणवीस यांना विरोध असण्याचं काही कारण नाही. राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावलं की मग आम्ही आपआपसात बसून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेऊ, असं भुजबळ म्हणाले.
आरक्षण मिळेपर्यंत सोडणार नाही, सरकार स्थापन होताच उपोषणाला बसणार..; जरांगेंचा महायुतीला इशारा
पुढं ते म्हणाले, आम्ही आपआपसात बसून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेऊ. तसेच कुणाला कशी मंत्रिपदं वाटायचं तेही ठरेल. कारण आता डिसेंबरचे अधिवेशनही समोर येत आहे. लवकरच निर्णय घ्यावा लागेल, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
मला पाडण्याचा प्रयत्न, पण…
यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर कोपरखळी मारली. मला पाडण्याचा त्यांना खूप प्रयत्न केला पण जनतेने साथ दिली, असं भुजबळ. ते म्हणाले, प्रचार संपण्याच्या एक दिवस आधी जरांगे माझ्या मतदारसंघात आला. माझं काहीही होऊ शकतं. आपल्या लेकरांबाळासांठी लढयतो, त्यांना (छगन भुजबळ) पाडा असं सगळं सांगितलं. माझ्या मतदारसंघावर त्याचा परिणाम झाला. मात्र हिंदू, मुस्लिम, दलित या सर्वांनी एकदिलाने मतदान केले आणि मी जिंकलो, असेही भुजबळांनी स्पष्ट केले.