Chief Election Commissioner Rajiv Kumar On election trend: महाराष्ट्र व झारखंड विधानसभेचा निवडणूक (Assembly Election) कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी जाहीर केलाय. निवडणुकीचा एक्सिट पोल, मतमोजणीच्या दिवशी टीव्ही चॅनेलवर येत असलेल्या निकाला कल (ट्रेंड) यावर मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. एक्झिट पोल कसे घेतले जातात, मतमोजणीच्या दिवशी निकालाचा कल, मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच येतो. हा मुर्खपणा आहे. त्यामुळे एक्झिट पोल आणि निकालाचा कल याबाबत आत्मपरिक्षण केले पाहिजे, असे आवाहान राजीव कुमार यांनी केले आहे.
एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे एक्झिट घेणाऱ्या संस्थांनी आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता आहे. तो देताना विशेषत: इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांनी विचारमंथन आणि आत्मपरीक्षणाची बाब आहे. निवडणूक आयोग व एक्झिट पोलचा संबंध येत नाही. परंतु तो घेताना संस्थांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नमुन्याचा आकार काय होता, सर्वेक्षण कोठे केले गेले, निकाल कसा आला आणि त्या निकालाशी जुळत नसल्यास निवडणूक आयोगाची जबाबदारी काय आहे ? असे प्रश्न मुख्य निवडणूक आयुक्त यांनी उपस्थित केले. एक्झिट पोस्ट करणाऱ्या संस्थांना स्वतः नियमन करण्याची वेळ आली असल्याचे निवडणूक आयुक्त यांनी म्हटले आहे.
फडणवीसांची जिरवून सुपडासाफ करा; निवडणूक जाहीर होताच जरांगेंचे आदेश निघाले
तसेच निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यानंतर 15-30 मिनिटांत टीव्ही चॅनेलवर दाखवल्या जाणाऱ्या सुरुवातीच्या निकालाच्या ट्रेंडवरही आयुक्तांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक संपल्यानंतर साधारणतः तिसऱ्या दिवशी मतमोजणी होते. पण मतदानाच्या संध्याकाळी 6 वाजल्यापासून एक्झिट पोल सुरू होतो. त्याला कुठला ठोस आधार नाही. जेव्हा मतमोजणी सुरू होते, तेव्हा सकाळी 8.05-8.10 वाजता टीव्हीवर निकाल येऊ लागतात. हे मूर्खपणाचे आहे. कारण ईव्हीएमची मतमोजणीच सकाळी 8.30 वाजता सुरू होते, असा टोलाही आयुक्तांनी लगावला आहे.
निवडणूक आयोग सकाळी 9.30 वाजता निकाल वेबसाइटवर टाकण्यास सुरुवात करतो आणि जेव्हा प्रत्यक्ष निकाल येण्यास सुरुवात होते तेव्हा कल आणि प्रत्यक्षात निकालात फरक पडतो. या विसंगतीमुळे काही वेळा गंभीर समस्या उद्भवू शकतात, असा धोका त्यांनी व्यक्त केला आहे. अपेक्षा आणि यश यांच्यातील अंतर हे निराशाशिवाय दुसरे काही नाही आणि हा मुद्दा असा आहे की त्यावर थोडा विचार करण्याची गरज आहे, असे आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले आहे.
हरियाणात एक्झिट पोल ‘फोल’ ठरला
नुकतीच हरियाणा विधानसभा निवडणुक झाली. या राज्यात काँग्रेसची सत्ता येईल, असे अनेक एक्झिट पोल होते. परंतु प्रत्यक्षात मतमोजणीनंतर चित्र उलटे झाले. या राज्यामध्ये तिसऱ्यांचा भाजप विजयी झाला. भाजपला 48 जागा मिळाल्या. तर निकालाच्या दिवशी ट्रेंडमध्ये सुरुवातीला काँग्रेसला स्पष्ट बहुमत दाखवत होते, याकडे निवडणूक आयुक्तांनी लक्ष वेधले.