Download App

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव व तुळशी विवाह संपन्न

Shrimant Bhausaheb Rangari Ganapati : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त

  • Written By: Last Updated:

Shrimant Bhausaheb Rangari Ganapati : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ (Shrimant Bhausaheb Rangari Ganapati) येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव, तुळशी (Tulsi) विवाह आणि 56 भोग चा नैवेद्य करण्यात आला. यावेळी विविध पंच पक्वान आणि फळाची आरास बाप्पा समोर साकारण्यात आली होती.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टने नेहमी प्रमाणे सामाजिक भान राखून बाप्पाला दाखविण्यात येणाऱ्या नैवद्यातील सर्व मिठाई, फराळ आणि फळे सामाजिक संस्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दत्तवाडी येथील देवतारू आश्रम आणि मुळशी खोऱ्यातील कातकर वस्ती वरील 300 विद्यार्थ्याना शिक्षण देणाऱ्या आणि दररोज 90 मुलांना जेवण पुरविणाऱ्या पौड येथील ‘डोनेट ऐड’ संस्था आणि भाजे येथील बालग्राम केंद्र यासर्वांना हे सर्व नैवेद्यचे पदार्थ देण्यात येणार आहे.

… तेव्हा वर्षा बंगल्यावर एंट्री नव्हती, योगेश कदमांचा ठाकरेंबद्दल मोठा खुलासा

दिव्यांच्या सजावटीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाचे मंदिर उजळले त्रिपुरारी पौर्णिमेंनिमित्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात दिवे लावून फुलांनी सुंदर सजावट करण्यात आली होती. काचेच्या ग्लासमधील दिव्यांनी संपूर्ण मंदीर उजळून निघाले होते. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. ट्रस्टचे सर्व पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.

धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, बच्चू कडूंचा भाजपवर हल्लाबोल

follow us