Download App

… तर मशिदींवरून लाऊडस्पीकर उतरवणार, राज ठाकरेंची मोठी घोषणा

Raj Thackeray : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठिंबा देणारे मनसे अध्यक्ष

  • Written By: Last Updated:

Raj Thackeray : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठिंबा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील विधानसभा निवडणुकीत 100 पेक्षा जास्त उमेदवार दिले आहे. तसेच यावेळी मनसे राज्यात ‘किंगमेकर’ ठरणार असल्याचा दावा देखील मनसेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे किती जागांवर विजय मिळवणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील मतदारांना आकर्षित करण्यासाठी संपूर्ण राज्यात सभा घेत आहे. अमरावतीमध्ये (Amravati) देखील त्यांनी मनसेचे उमेदवार मंगेश पाटील यांच्‍या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना सत्ता आली तर मशिदींवरील भोंगे उतरवणार असं त्यांनी म्हटले आहे. तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या काळात आम्ही मशिदींवरचे भोंगे बंद करण्यासाठी आंदोलन केला होता आणि त्यावेळी मनसेच्‍या 17 हजार कार्यकर्त्‍यांच्‍या विरोधात गुन्‍हे दाखल झाले होते. असं देखील राज ठाकरे म्हणाले.

या सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ही कुणाची माणसे आहेत. कुणाला जपताहेत. मुंबईत समुद्रात अनधिकृतपणे एक मजार बांधण्‍यात येत होती. आम्ही ते उघड करताच एका रात्रीत ती पाडण्यात आली. हिंमत कशी होते या लोकांची. हे लोक रस्त्यावर येऊन नमाज पठण करतात. मुस्लिमांनी त्‍यांचा धर्म घरात ठेवावा. तो उंबरठा ओलांडून बाहेर यायला नको.असं राज ठाकरे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत जेव्हा नवनीत राणा (Navneet Rana) यांचा पराभव झाला तेव्हा मुस्लिमांनी रस्‍त्‍यावर येऊन जल्‍लोष केला. पाकिस्‍तानचे झेंडे नाचवत उत्‍सव साजरा केला. आम्‍हाला त्‍याचे काहीच वाटत नाही. आम्‍ही बाहेरून किती वेळ काम करायचे. एकवेळ सत्‍ता द्या, नाही सडकून काढले, तर म्‍हणा. परत यांची हिंमत होणार नाही. असेही या सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले.

तमन्ना भाटिया स्टारर सिकंदर का मुकद्दर, ‘या’ दिवशी होणार रिलीज

तसेच या सभेत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत काँग्रेस, राष्‍ट्रवादीचे लोक दुखावले जाऊ नयेत, म्हणून उद्धव ठाकरे यांनी स्‍वत:च्‍या वडिलांच्‍या नावासमोरील हिंदूहृदयसम्राट हे बिरूद काढून टाकेल. असेही ते म्हणाले.

follow us