मंचर : आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेडला डिंभे धरण बोगद्याचे पाणी देण्यासाठी आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून उभे केलेलं बुजगावणं म्हणजे देवदत्त निकम आहेत, अशी जिव्हारी लागणारी टीका शरद शहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी केली आहे. यावेळी शहा यांनी आमदारकी मिळविण्यासाठी निकमांनी संस्थांची बदनामी करून जनतेची दिशाभूल थांबवावी अन्यथा त्यांच्या सर्व भानगडी बाहेर काढू, असा इशाराही दिला आहे. शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी दिला. ते एकलहरे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही; भीमाशंकर कारखान्याच्या अध्यक्षांनी निकमांना सुनावलं
शहा म्हणाले की, निकम यांनी केवळ आमदारकी मिळवण्यासाठी टिंगल टवाळ्या सुरू केल्या आहेत. या उलट दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्याकडे विकासाचे मुद्दे, व्हिजन आहे. निकम यांच्याकडे सांगायला काहीच नाही. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त होऊन बेछूट आरोप करू लागले आहेत. त्यांना जनता योग्य उत्तर देईल. निकम आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखाना, शरद सहकारी बँकेवर वाट्टेल ते आरोप करीत आहेत.त्यामुळे त्यांनी संस्थांची बदनामी करून जनतेची दिशाभूल थांबवावी अन्यथा त्यांच्या सर्व भानगडी बाहेर काढू, असा इशाराही दिला आहे. शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी दिला आहे.
वळसे पाटलांची ताकद दुपटीने वाढली; मोठ्या उद्योजकाने उचलला विजयाचा ‘विडा’
महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि. १४) मंचर येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. त्यामध्ये उमेदवार देवदत्त निकम यांनी तालुक्यातील आर्थिक संस्था, त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर वाटेल ते आरोप केले. त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शहा बोलत होते. शहा म्हणाले की, दिलीप वळसे पाटील यांनी निकम यांना भीमाशंकर कारखान्यात दहा वर्षे व मंचर बाजार समितीत अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. परंतु, त्यांनी संचालक, व्यापारी, हमाल, मापाडी, शेतकऱ्यांना त्रास देण्याचे काम केल्याचे शहा यांनी सांगितले. यावेळी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, भीमाशंकरकारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, संचालक अंकित जाधव, बाजार समितीचे संचालक नीलेश थोरात उपस्थित होते.