Download App

मोठी बातमी! मालेगांव मध्य AIMIM चे मुफ्ती इस्माइल फक्त 75 मतांनी विजयी

Maharashtra Assembly Election : मालेगांव मध्य विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत एमआयएमचे उमेदवार मुफ्ती इस्माइल फक्त 75 मतांनी

  • Written By: Last Updated:

Maharashtra Assembly Election : मालेगांव मध्य विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत एमआयएमचे उमेदवार मुफ्ती इस्माइल (Mufti Ismail)फक्त 75 मतांनी विजयी झाले आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार आसिफ शेख रशीद यांचा पराभव केला आहे.

तर दुसरीकडे औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात (Aurangabad East Constituency) भाजप आणि महायुतीचे उमेदवार अतुल सावे (Atul Save) विजयी झाले आहे. त्यांनी अटीतटीच्या लढतीत एमआयएमचे उमेदवार आणि माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांचा पराभव केला आहे. शेवटच्या फेरीत लागलेल्या निकालात अखेर भाजप उमेदवार अतुल सावे यांनी बाजी मारली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीचे अनेक जेष्ठ नेते पराभव झाले आहे. संगमेनर विधानसभा मतदारसंघातून राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पराभव झाला आहे तर कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला आहे. तर राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना देखील या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

औरंगाबाद पूर्व मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत इम्तियाज जलील यांचा पराभव

सध्या भाजप 133 जागांवर पुढे असून शिवसेना शिंदे गट 56 तर अजित पवार गट 41 जागांवर पुढे आहे. तर शिवसेना (ठाकरे गट) 20, काँग्रेस 16, राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार गट) 10 आणि समाजवादी पक्ष 2 जागांवर तर अपक्ष 10 जागांवर पुढे आहे.

follow us